Accident in Jalna Two bikes collide head-on Three die on the spot, one seriously injured : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी-राजूर मार्गावर रविवारी रात्री दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
राज्यातील 85 हजार कृषी सेवा केंद्रांनी पुकारला बेमुदत संप; शेतकऱ्यांवर होणार थेट परिणाम
या अपघातात नळणी येथील सुभाष साठे, विकास साठे यांचा मृत्यू झाला आहे. तर बरंजळा साबळे येथील अनिल बोराडे या तरुणाचा मृत्यू झाला असून समाधान कोरके हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेईंचाही मृत्यू? मशहद शहरामध्ये लागलेल्या पोस्टर्सने खळबळ
यातील मयेत अनिल बोराडे व समाधान कोरके हें तरुण जालना येथे मुंबई हायकोर्टाच्या कलर्क ह्या पदाच्या परीक्षा देण्यासाठी जालना येथे गेले होते. परीक्षा देऊन घरी येताना हा अपघात झाला. त्यामुळे त्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न अधुरच राहिलं आहे. त्यांच्या अपघातानंतर कुटुंबासह बरंजळा साबळे गावावर शोककळा पसरली आहे.
