Ajit Pawar Anounces for Beed Airport : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये बीड जिल्हा हा संतोष देशमुख हत्या प्रकरण त्याचबरोबर इतरही राज्यासह देश हादरवून टाकणाऱ्या घटनांनी चर्चेत आला आहे. मात्र आता या जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी सोर आली आहे. ती म्हणजे बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्यात येणार आहे.
‘मंज़िलें अभी और भी हैं…’ शीतल म्हात्रे शिंदेंवर नाराज? विधान परिषदेची उमेदवारी चंद्रकांत रघुवंशींना
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याची अधिकृत घोषणा केली. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर बीड जिल्हावासीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील जनतेचे बहुप्रतिक्षित स्वप्न मूर्त स्वरूपात साकार होणार आहे.
जिल्हा प्रशासनाने विमानतळ उभारणीचा परिपूर्ण प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे सादर केला होता. त्यामुळे या प्रकल्पाला आता गती मिळेल. रेल्वेप्रमाणेच विमानसेवेचे स्वप्न साकार होणार आहे या ऐतिहासिक निर्णयामागे वेळोवेळी मागणी करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे. हा विकास प्रकल्प बीडच्या भविष्याची नवी दिशा ठरू शकेल. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा विकास वेगाने साधला जाईल असा विश्वास वाटतो! अशी फेसबुक पोस्ट आमदार धनंजय मुंडे यांनी दिली.