Download App

ये दारू, पी दारू, काय चाललंय…Ajit Pawar यांची मंत्री Sandipan Bhumare यांच्यावर टीका

  • Written By: Last Updated:

पैठण : शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला. शिंदे गटाने सत्ता स्थानपण केल्यानंतर अनेक इच्छुकांना मंत्रीपद देखील मिळाले. यातच शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे सध्या चर्चेत आहे. नुकतेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री भुमरे (Sandipan Bhumare ) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ये दारू, पी दारू, काय चाललंय… भुमरे यांनी दारूची दुकानं उघडली, असं म्हणत अजित पवार यांनी जोरदार टीका केली.

अजित पवार औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी भुमरे यांच्या मतदासंघात अजित पवारांची सभा पार पडली. यावेळी पवार यांनी भुमरे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. पवार म्हणाले. ‘पैठण तालुक्यात जायकवाडी धरण, दोन सहकारी कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, एमआयडीसी, दोन महाविद्यालय हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दिले.

अरे मग या मंत्री भुमऱ्यांनी काय दिलं, ये दारू, पि दारू, काय चाललंय…ज्या जनतेने निवडून दिले त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आणि तुम्ही दारूचे दुकान उघडत सुटला. एकनाथ महाराजांना काय वाटत असेल. तरुण पिढीला दारूची सवय लावून संसाराची राख रांगोळी करत आहे.

दारूच्या दुकानासमोर स्पीड ब्रेकर लावली, गाडी थांबावी, त्याने पाहावं आणि टाकून जावं. स्पीड ब्रेकर ही शाळेसमोर लावली जातात, मात्र इथं तर दारूच्या दुकानासमोर स्पीड ब्रेकर लावली जात आहे. अरे कुठे फेडाल ही पाप, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली.

साखर कारखाने हिसकावून घेतले मग चालवण्यात दम का नाही. तुमच्या इथं पाणी आहे, पण तुमच्या लोकप्रतिनिधीच्या अंगात पाणी नाही. जे खरं आहे तेच सांगतो, जर चुकीचे बोलत असेल तर कुणी सांगावं मागे घ्या, तर मी मागे घेतो.

आता कुठे तरी नीट विचार केलं पाहिजे. पाच वर्ष अशी निघून जातात. शेतकऱ्याचं पिक जर उद्ध्वस्त झालं तर 3 वर्ष पिक येत नाही, त्यामुळे एक आमदार निवडला तर मतदारसंघाचं वाटोळं होतं, अशी टीकाही अजित पवारांनी केली.

follow us