Beed News : मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर बीडमधील गुंडगिरी राज्याच चर्चेचा विषय ठरली. हे हत्या प्रकरण ताजे असतानाच बीडच्या अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.
सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांना त्रास दिला जातोय, प्रकाश आंबेडकरांची थेट CM फडणवीसांकडे तक्रार..
शहरातील मुकुंदराज रोडवरील एका शेतात तरुणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे खळबळ उडाली. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला.
प्राप्त माहितीनुसार, मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे वय 25 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. अंबाजोगाईतील मुकुंदराज रोडवरील गवळी यांच्या शेतात हा मृतदेह आढळून आला. मृत तरुणाच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा असल्याचे समोर आलं. शौकत अली मेहराज अली सय्यद (वय 25 वर्षे, रा. बीड), असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, हा घात आहे की अपघात? याचा तपास आता अंबाजोगाई पोलीस करत आहेत.
आर्थिक वाद अन् कोयत्याने पाच वार.., शुभदा कोदारे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
11 महिन्यात 36 खून, 156 अत्याचाराच्या घटना
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले. यानंतर बीडमध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर गेल्या 11 महिन्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत जिल्ह्यात 36 खुन झालेत. म्हणजे, दरमहा दोन हत्या झाल्यात. खुनाच्या घटनांशिवाय खुनाच्या प्रयत्न केल्याच्याही तब्बल 168 घटना घडलेल्या आहे. यावरून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट शिल्लक राहिली नसल्यांचं दिसतंय.