Marathwada Drought : राज्यातील 75 टक्के भागात दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाड्यात बिकट परिस्थिती आहे. पण प्रशासनावर स्तरावर दिरंगाईचा एक प्रकार उघडकीस आला आहे. बीडमधील केजमध्ये मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी व विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर होते. परवानगीशिवाय कोणीही मुख्यालय सोडू नये, असे आदेश असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला दांडी मारणे तहसीलदारांना महागात पडले आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन (Bharat Gangawane) यांनी तहसीलदार भारत गंगावणे (Kej Tehsildar Bharat Gangawane) यांचा पदभार काढत मोठा दणका दिलाय.
पितृपक्षात बनवा मराठवाड्याची खास अख्ख्या गव्हाची खीर; खीर फुटणार नाही, ‘ही’ पद्धत लक्षात ठेवा
बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालीय. या परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर काम करणे अपेक्षित आहे. पण तहसीलदारांना हलगर्जीपणा केलेले आहे. आता तहसीलदारांचा चार्ज नायब तहसीलदार अशोक भंडारे यांना दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी लेखी आदेश काढलेत. केज तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जॉन्सन यांनी स्वतः शनिवारी (ता.२६) केज तहसील कार्यालयास भेट दिली होती.
अग्निवीरांना नोकरीत 10% आरक्षण ते लॉजिस्टिक्स पार्कला सवलती; मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय
आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत दुष्काळ निवारणाचा महत्त्वाचा आढावा बैठक झाली. दुष्काळाच्या काळात तालुकास्तरावर तहसीलदार हेच संपूर्ण उपाययोजनांचे मुख्य समन्वयक आणि जबाबदार प्रमुख अधिकारी असतात. परंतु, अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या बैठकीस पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश असतानाही तहसीलदार गंगावणे या बैठकीला गैरहजर राहिले.
