Chandrakant Khaire : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप (BJP) आणि महायुतीला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील भाजपचे बडे नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदेंनी (Raju Shinde) उद्धव ठाकरेंच्या भाजप ((Uddhav Thackeray) उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यावर आता खैरेंनी प्रतिक्रिया दिली.
आम्हीच खरी शिवसेना, लहान बाळासारखे किती वेळा रडणार?, ठाकरेंच्या टीकेला CM शिंदेंचे प्रत्युत्तर
राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी माध्यांशी संवाद साधला. यावेळी खैरे यांना राजू शिंदे यांच्या पक्षप्रवेशावर तुम्ही नाराजी आहे का? असा सवाल विचारला. त्यावर बोलतांना खैरे म्हणाले, नाही… मात्र, आम्ही राजू शिदेंना सांगितलं होत की, तुम्हाला आमच्या पक्षात यायचं असेल तर लोकसभा निवडणुकीपूर्वी या. त्याचा आमच्या पक्षालही फायदा होईल. मात्र ते लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपातच थांबले आणि त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांना मदत केली. तसेच शिंदे यांनी भुमरे यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्यासही मतद केली. त्यांच्यामुळे मी दोनवेळा निवडणुका हरलो. आता ते आमच्या पक्षात आले आहेत तर काहीतरी चांगलं काम करतील, अशी मी आशा व्यक्त करतो, असं खैरे म्हणाले.
पाठीशी घालणार नाही, दोषींवर कडक कारवाई करणार; वरळी हिट अॅंड रनप्रकरणी CM शिंदेंची प्रतिक्रिया
छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैर यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. अशातच राजू शिंदेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे खैरेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. याबाबत खैरेंना विचारले असता ते म्हणाले, विधानसभा निवडणूक लढवण्यास मी सध्या इच्छुक नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर मी नक्कीच निवडणूक लढवेन. मात्र, कोणाला उमेदवारी द्यायची हे उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. ते योग्य तो निर्णय घेतील, असं खैरे म्हणाले.
दरम्यान, राजू शिंदे यांच्यासह भाजपचे नगरसेवक गोकुळ मलके, प्रल्हाद निमगावकर, अक्रम पटेल, प्रकाश गायकवाड, रूपचंद वाघमारे यांनी ऐन विधानसभा निडवणुकीपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला.