मुंबई : माझ्यावरील गुन्हा औरंगाबाद नावापेक्षा मोठा नाही, असं विधान छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. नामांतरविरोधात जलील यांच्या नेतृत्वात कॅंडल लाईट मार्च आयोजित करण्यात आला. मात्र, या मार्चला दबावामुळे पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप खासदार जलील यांन केला आहे.
पाकिस्तानच्या राजकीय वादात अक्षयच्या ‘केसरी’ची एन्ट्री; इम्रान खानच्या ट्विटनं वेधलं लक्ष
पुढे बोलताना जलील म्हणाले, आम्ही आंदोलनासाठी अनेकदा पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र, पण दबावामुळे पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली आहे. परवानगी देऊ नये, यासाठी सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न होत आहे. आम्हाला लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा अधिकार तो सर्वांना आहे.
लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यास आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर शिवसेना नेत्यांच्या कार्यालयासमोरही आंदोलन झालं त्यांच्यावरही कारवाई करणार का? असा सवालही खासदार जलील यांनी यावेळी केला आहे. हे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने करीत आहे.
राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे: विधान परिषदेतून पवारांचे प्रादेशिक संतुलन
सत्तेत बसलेल्या लोकांना वाटत असेल लोकशाही संपली आणि हुकुमशाही सुरु झाली हे आदेश औरंगाबादकरांनाही मान्य नसून
पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशाराही खासदार जलील यांनी दिला आहे.
शांततेत मी आणखीन कितीही दिवस आणि वर्ष आंदोलन करु शकतो, आंदोलन न करण्याच एक कारण मला स्पष्ट करावं, जिल्ह्यातील पोलिसही राजकीय पक्षांच्या आदेशाने काम करीत असल्याचा आरोप यावेळी खासदार जलील यांनी केला आहे. दरम्यान, नामांतरविरोधात आम्ही केलेल्या आंदोलनाचे गुन्हे दाखल झाले हे गुन्हे औरंगाबाद नावापेक्षा मोठे नसल्याचं ते म्हणाले आहेत.