Chatrapati Sambhajinagar Theft : छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. एका सोन्याच्या दुकानात एक धाडसी चोरी झाली असल्याची माहिती समोर आलीयं. ग्राहक बनून आलेल्या चार बुरखाधारी महिलांनी तब्बल दीड किलो सोन्याची (Gold Theft Sambhajinagar) चोरी केल्याची धक्कादायक घटना घडलीयं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ही चोरीची घटना घडली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्राहक बनून आलेल्या महिलांकडून तब्बल दीड किलो सोन्याची चोरी करण्यात आली आहे. छत्रपती संभआजीनगरच्या शहागंज परिसरातील विश्वास ज्वेलर्समध्ये ही चोरीची घटना घडलीयं. आधी दोन पुरुष आणि चार महिला एकामागे एक दुकानात आले. त्यानंतर दीड किलो सोन्याचा डब्बा लांबवला आहे. सुरुवातीला रेकी केली त्यानंतर दीड किलो सोने घेऊन पसार झाले आहेत.
यामध्ये दोन पुरुष आणि चार बुरखाधारी महिलांनी चोरी केल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या धाडसी चोरीनंतर जिल्ह्यात गुन्हेगारांवर पोलिस प्रशासनाचा धाक राहिला की नाही? असा सवाल सर्वासामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
