Sanjay Shirsat on Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बदलत्या वक्तव्यांवरुन जोरदार टीका केली आहे. आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आमदार शिरसाट यांनी सांगितले की, संजय राऊत आधी म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. पण आता जसे शरद पवार आपलं स्टेटमेंट बदलतात तसेच संजय राऊतही आपले स्टेटमेंट बदलत आहेत. संजय राऊतांची भूमिका ही गांडूळासारखी असल्याची टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली.
Subhedarसाठी नागराजने घेतला महत्त्वाचा पुढाकार; सिनेमाच्या पहिल्या दिवशी केली एवढी कमाई!
संजय राऊत यांचं काल शरद पवार यांच्याबद्दलचं मत ही बंडखोरी नाही तर काय? असं होतं, आणि आज थेट छुपा गणिमी कावा असं म्हणतात, त्यामुळे खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांनी सर्व गोष्टींचा अभ्यास करुन अशा बडबड करणाऱ्या भोंग्यांच्या मागे लाथ मारुन शिवसेना ठाकरे गटातून बाहेर काढलं पाहिजे असेही यावेळी आमदार संजय शिससाट म्हणाले.
संतापजनक! चोरीच्या संशयातून तरुणांना उलटं टांगून जबर मारहाण, नगर जिल्ह्यातील घटना
हा जो गोंधळ महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. काही लोकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका काय आहे? हे समजायला आणखी वेळ लागत आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे आमचे मोठे नेते आहेत हे आधीच मान्य केले आहे. कॉंग्रेस आणि ठाकरे गटाची संभ्रमावस्था आहे. गैरसमज हे लोकांमध्ये होत नाहीत. तर त्यांच्या अंतर्गत गैरसमज होत आहेत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी टीका केली.
पत्रकारांनी आमदार संजय शिरसाट यांनी विचारले की, आपण म्हणाला होतात की, ठाकरे परिवारातील एकजण जेलमध्ये जाईल, त्याची तारिख जवळ आली आहे, त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, ही तारिख अत्यंत जवळ आली आहे. या सगळ्या ज्या कारवाया आहेत, त्या थांबत नसतात, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्या एजन्सीमध्ये आहे. ते निर्णय घेतील त्यावेळी या सर्वांना कळेल. ज्यावेळी ठाकरे कुटुंबावर कारवाई होईल तेव्हा खासदार संजय राऊत हे पेढे वाटत फिरतील, त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागेल, असेही शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले.