Download App

‘संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन केलं होतं का? फडणवीसांचा थेट सवाल

Image Credit: Letsupp

Devendra Fadnvis : संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन केलं होतं का? असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच नाव न घेता टीक केली आहे. href=”https://letsupp.com/maharashtra/marathwada/manoj-jarange-patil-on-devendra-fadanvis-attack-133293.html”>(Devendra Fadnvis) दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा; अमित शाहांची तोफ धडाडली

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे संभाजीनगर असेल अशी घोषणा बाळासाहेबांनी केली पण दुर्देवाने उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष जाग आली नाही आणि शेवटच्या दिवशी त्यांनी ठराव करण्याचा प्रयत्न केला पण ते सफल झालं नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा संभाजीनगर नावाची घोषणा केली. केंद्राकडे प्रस्ताव पाठवून त्याला अमित शाहा यांनी मान्यता दिली होती.

रणदीप हुड्डाचं मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

इतिहासात जेव्हा दुफळी आली तेव्हा आम्ही गुलामगिरीत गेलो. मागील लोकसभा निवडणूकीत चुकीच्या पद्धतीने मतदान केलं तर काय होतं ते आपण पाहिलं आहे. संभाजीनगरच्या खासदाराने 370 साठी हात वर केला होता का? राम मंदिराला समर्थन दिलं होतं का? मोदींच्या कार्यक्रमांना समर्थन दिलं होतं का? असा सवाल उपस्थित करीत फडणवीसांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

वुमन फिटनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार सोहळा: ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने पटकावला

तसेच आपण चूक केली तर संभाजीनगरचं नाव 370 ला विरोध करणाऱ्यांच्या यादीत खासदारांनी जाऊन बसवलं. जे आपले होते तेही त्यांच्याच रांगेत जाऊन बसले. जे 370 राम मंदिरला विरोध करत होते. आता मोदींना 400 जागा द्यायच्या आहेत त्यातील संभाजीनगरचा खासदार मोदींचा असेल. यावेळी चूक करु नका काही लोकं थेट विरोधात येतील काही बहुरुपी येतील हे बहुरुपी आहे. इकडे हिंदुत्वाचं नाव सांगतात अन् कॅलेंडमध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे नाव लिहितात अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

follow us

वेब स्टोरीज