Dhananjay Munde : समोरचा उमेदवार मी शेतकरी पुत्र म्हणून कायम सांगत असतो. मात्र, मी सुद्धा कृषीमंत्री आहे. त्यामुळे मला खात्री करावी लागेल हे कशाची शेती करतात. हे कशाची तस्करी करतात अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केली. ते महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
मराठवाड्याला पाणी प्रकल्प
गोदावरी धरणाची पाण्याची तुट मोठी आहे. ती भरून काढायची असेल तर आपल्याला मोठे प्रयत्न करावे लागतील. या जिल्ह्यात पाण्या अभावी जिल्ह्यात मोठी जमीन जिराईत आहे. त्यामुळे पाण्याची मोठी गरज आहे. त्यामुळे महायुती सरकारने तत्वत: मान्यता दिल्याने लवकरच हा प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर आपल्याला मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
रेल्वे प्रश्न सोडवणार
यावेळी धनंजय मंडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचं नाव न घेता थेट चंदन तस्कर अशी त्यांच्यावर टीका केली आहे. तसंच, अशा चंदन तस्कराला आपण मतदान करणार का ? असा प्रश्न उपस्थित करत उपस्थितांना पंकजा मुंडे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, घाटनांदूर ते अंबाजोगाई हा रेल्वेचा प्रश्न मार्गी लावणार अशी पंकजा मुंडे यांची गॅरंटी आहे. येणाऱ्या पाच वर्षात आपल्याला सोडवायचा आहे असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
चंदन तस्करीचा टेम्पो पकडला
बीड जिल्ह्यतील केजमध्ये पोलिसांनी नुकताच चंदनाची तस्करी करणारा टेम्पो ताब्यात घेतल्याची घटना समोर आली होती. यामध्ये 2 कोटी 18 लाख रुपये किंमतीचे जवळपास सव्वा टन चंदन जप्त करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक व वाहकाला अटक केली आहे. त्यामध्ये प्राथमिक चौकशीत हे चंदन शरद पवार गटाचे नगरसेवक असल्याचं समोर आलं आहे.