Download App

Ambadas Danave : ‘राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं वाटत नाही’

औरंगाबाद : राज्यातील सरकार असंवैधानिक आहे. अशा सरकारचं न्यायालय कोणत्याही क्षणी काय करेल हे सांगता येत नाही. त्यामुळं राज्य सरकारचा विस्तार होणार नसल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी राज्य सरकारवर केली आहे. त्यांनी औरंगाबादमध्ये (Auranagabad) माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी विरोधीपक्षनेते दानवे म्हणाले की, आम्ही नेहमीच म्हणतो मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, कोर्टात सुनावणी सुरु आहे. 16 आमदारांनी पक्ष भंग केलाय, कारवाई होईल म्हणून कोर्ट काय करेल सांगता येत नाही, म्हणून विस्तार होत नाही. त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जर निकाल त्यांच्याच बाजूनं लागणार असं म्हणत असतील तर शंकेला वाव आहे, असंही यावेळी दानवे म्हणाले.

पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई झाल्यास 16 जणांवर व्हावी हाच कायदा आहे. शिक्षकांना पेन्शन लागू होणार असं मुख्यमंत्री सांगतात, हा आचारसंहितेचा भंग आहे. सत्ताधारी असताना चुका लक्षात आणाव्यात. अशा पद्धतीनं प्राचार्यांना मारणं योग्य नाही. त्यांच्या सवयीचा भाग आहे, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवीच अशीही मागणी करण्यात आली.

पुणे जिल्ह्याच्या यवतमध्ये 7 जणांची हत्या, हे दुर्दैंवी आहे. अंधश्रद्धेतून हत्या होत असेल तर व्यवस्थेकडं लक्ष देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीचा पुण्यातील दोन जागांच्या पोटनिवडणुकीबाबत आज निर्णय होईल. लढायचं की नाही त्यानंतर निर्णय होईल, असंही यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितलं.

Tags

follow us