Download App

मराठवाड्यात राष्ट्रवादीत बिनसलं, शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत होणार

औरंगाबाद : औरंगाबाद शिक्षक मतदासंघात आज अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट झाल्यांच दिसून येतंय. औरंगाबाद मतदारसंघात महाविकास आघाडी आणि भाजप, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. भाजपकडून किरण पाटील तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेऊन बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालंय.

औरंगाबद शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 15 इच्छूक उमेदवारांनी अर्ज केला, मात्र यातील काही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याचं दिसून आलंय. एकूण 15 पैकी 01 उमेदवाराने आपला अर्ज माघारी घेतला आहे. अर्ज भरण्याच्या दिवशी या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे काँग्रसचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील, वंचितचे कालिदास माने, अपक्ष उमेदवार अनिकेत वाघचवरे, अश्विनीकुमार क्षीरसागर, आशिष देशमुख, कादरी शाहेद अब्दुल गफार गणेश शेटकर, नितीन कुलकर्णी, प्रदीप साळुंके, मनोज पाटील, विशाल नांदरकर, सूर्यकांत विश्वासराव, संजय तायडे, ज्ञानोबा डुकरे यांनी अर्ज केला होता.

अखेर यातील एकूण 15 पैकी 01 उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने ही लढत आता तिरंगी होणार असल्याचं दिसून येत आहेत. तर या मतदारसंघासाठी एकूण 14 उमेदवार आपलं भवितव्य आजमवणार आहेत. दरम्यान, तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्याकडून निवडणुक जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरु असून मतदार आम्हांलाच निवडुन देणार असल्याचा विश्वास दोघांकडूनही व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडं राष्ट्रवादीचे प्रदिप सोळुंके यांनीही आपण जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.

दरम्यान, येत्या 30 जानेवारीला ही निवडणूक पार पडणार असून निवडणुकीसाठी 61 हजार 529 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 222 मुळ आणि 5 सहाय्यकारी असे एकूण 227 मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज असणार आहेत.

Tags

follow us