International Women Day 2025 : अपंगत्व असो किंवा अपघाती आलेलं आजरपण असो यामध्ये सकारात्मकता महत्वाची असते. अनेकांना काहीही वाटलं तरी आपला जगण्यातला हुरूप कायम ताजा असावा. कारण, समाजात आपल्याला काही झालं तर आपला स्वत:चा एक न्यूनगंड असतो आणि लोकही त्याला खतपाणी घालतात त्यामुळे हे गरजेचं आहे असं प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केलं. (Women Day ) आज जागतिक महिला दिनानिमीत्त एमजीएम विद्यापीठ (MGM)छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचा ‘सक्षमा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर विद्यापिठाचे कुलपती अंकुशराव कदम,सौ अनुराधा कदम, श्री. शशिकला बोराडे, सौ. जयश्री जाधव, आणि पत्रकारिता विभागाच्या प्रमुख रेखा शेळके उपस्थित होत्या.
यावेळी नवांगुळ यांची पत्रकारितेच्या विद्यार्थीनिंनी मुलाखत घेतली. त्याला उत्तर देत असताना नवांगुळ यांनी विस्तृत असं भाष्य केलं. यामध्ये त्या साहित्य क्षेत्रासह, महिला, अपंगत्व, सामाजिक, सांस्कृतीक राजकीय अशा विविध विषयांवर बोलल्या. आपल्या येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी सहज सुटल्या तर फार काही जे विनाकारण वाट्याला येतात ते कष्ट येत नाहीत. मात्र, छोट्या छोट्या गोष्टींसाठी झगडावं लागलं तर आपल्याला त्रास आणि सनिताप होतो असंही त्या म्हणाल्या. नवांगुळ यांचा लहान असताना अपघात झालेला असताना त्यांना व्हिलचेअरवर फिरावं लागतं. त्या चालू शकत नाहीत. मात्र, त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाने त्यांना झालेला अपघात पुर्णपणे झाकोळून गेलेला आहे.
दिल्लीतील साहित्य संमेलन दलालांचे, राऊतांच्या आरोपांवर संजय नहारांचं मुद्देसूद उत्तर
अपघाताने निर्माण झालेली ती एखादी परिस्थिती असते. त्यामुळे ते आजारपण नाही हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला कुणीही अपंग दिसला किंवा अपघाताने आलेली व्याधी असेल. तही जेव्हा केव्हा संवाद साधालं, त्यांना भेटाल तेव्हा फार मोकळेपणाणे बोललं पाहिजे. आनंदाने त्यांना बोलून संवाद केला पाहिजे. अतिव, सहानभुती आणि अतिव काळजी दाखण हे धोकादाय आहे असं मतही नवांगुळ यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच, आपला सबोवतालचा भवताल असा असावा की, तो आपलाल्या कायम बळ देत राहीलं असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
सोनाली नवांगुळ या स्पर्शज्ञान नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या उपसंपादक आहेत. 2008 पासून, त्या उपसंपादक म्हणून हे काम पाहतात. पुणे येथे 2014 साली झालेल्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षही होत्या. त्यांनी मूळ तामिळ लेखिका सलमा यांची कादंबरी मध्यंरात्रीनंतरचे तास या नावाने मराठीत अनुवादीत केली. या अनुवादीत कादंबरीला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे.