Download App

Video : “येवल्यावाला लई खौट अन् आतल्या गाठीचा..”, जरांगेंचा भुजबळांवर तिखट प्रहार

येवल्यावाला खौट शेंगादाणा आहे अशा गावरान भाषेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर तिखट टीका केली. 

Manoj Jarange Criticized Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील थेट मुंबईला (Manoj Jarange Patil) निघाले आहे. आता मुंबईतच उपोषण करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवरही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना पु्न्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर घणाघाती टीका केली. येवल्यावाला खौट शेंगादाणा आहे अशा गावरान भाषेत त्यांनी भुजबळ यांच्यावर तिखट टीका केली.

मनोज जरांगे यांनी आज लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा चांगलाच समाचार घेतला. जरांगे पाटील पुढे म्हणाले, ‘येवल्यावाला (छगन भुजबळ) लई आतल्या गाठीचा आहे. त्याचं आता भागलं आहे. ओबीसी ओबीसी म्हणून मंत्री झाला. सहा सात महिने काहीही बोलले नाहीत. त्यावेळी काही ओबीसींबद्दल दुःख वाटत नव्हतं का? गरीबांचे लेकरं मोठे व्हावेत असं या लोकांना वाटतच नाही. दुसऱ्यांचे लेकरं पुढे येऊ नयेत, नेते होऊ नयेत असंच त्यांना वाटतं. लई खौट आहेत ते. कुणी नेता झाला तर त्याच्या पोटात गोळा उठलाच. गावखेड्यात ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात कोणताच वाद नाही. मी कधीच कोणत्या जातीवर बोललो नाही. पण नेत्यांना मात्र मी आजिबात सोडत नाही.

शिंदे समितीला मुदतवाढ

मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी (Jarange Patil) उपसमितीची आज बैठक पार पडली. मनोज जरांगे यांची सरकारसोबत बोलण्याची तयारी आहे का? हा प्रश्न आहे. हैदराबाद गॅझेटचा आढावा आजच्या बैठकीत घेतला. जरांगे पाटलांनी काय बोलावं, आरोप करावे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मराठा समाजाला दिले. मात्र, मविआ सरकारने हे आरक्षण घालवले. मराठा आरक्षणावर शरद पवार, उद्धव ठाकरे भूमिका घ्यायला तयार नाहीत. आरक्षणासाठी काय केले हे त्यांनी जनतेला सांगावं असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

follow us