Karuna Sharma : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आता उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज माघारीसाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. काही ठिकाणी बंडखोरी तर काही ठिकाणी इच्छुकांनी पक्ष बदल करून तिकीट मिळवलं आहे. या बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय पक्षांनी खास मोहिम सुरू केली आहे. तर दुसरीकडे अर्ज छाननीत अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये करुणा शर्मा यांचाही उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा राक्षस असा उल्लेख केला आहे.
करुणा मुंडे करणार मोठा राजकीय गौप्यस्फोट; दाखवणार तो व्हिडीओ
महाराष्ट्रात आता लोकशाहीच राहिलेली नाही. मी परळी विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. यासाठी की तेथील दहशत आणि लोकांवरील अन्याय नाहीसे व्हावेत. मी एकटी महिला मला कोणताही सपोर्ट नसताना माझ्यामागे कोणताही मोठा राजकीय पक्ष नसताना जवळ पैसे नसतानाही मी लढत होते. माझा लोकांवर विश्वास होता की लोक मला निवडून देतील. यासाठी मी परळी आणि बीडमधून अर्ज दाखल केला होता.
पुढे करुणा शर्मा म्हणाल्या की, तो राक्षस आहे. मी २६ वर्षे त्याला स्वतःचं रक्त पाजलं. एक महिला स्वतःचं अस्तित्व गमावून पतीचं अस्तित्व बनवत असते. तू माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरवलेला नाही तर तू स्वतःची हार लिहून ठेवलेली आहेस. तू एक महिलेला भीत आहेस. याचा इतिहास साक्षी आहे. माझ्यामागे पैशांचं बळ नाही. माझ्यामागे पक्षाचं बळ नाही. तरीही मी लढणार होते. कारण माझा जनतेवर विश्वास होता. त्यामुळे मी परळी आणि बीडमधून अर्ज भरला होता.