Download App

बजरंग सोनावणेंना मदत करणं भोवलं; व्हायरल क्लिप प्रकरणात शिंदेंकडून खांडेंवर कारवाईचा दणका

बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने  दगडफेक करुन तोडले होते.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

बीड : दोन दिवसांपूर्वी कुंडलिक खांडे यांची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पक्ष विरोधी कारवाया केल्याने शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलीक खांडे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्यील पंकजा मुंडेंना कशी मदत केली नाही. धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या संदर्भातील संवाद आहे. (Kundlik Khade) या प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा देखील झाला आहे. (Beed) मात्र, त्यांच्यावर काही महिन्यापूर्वी 307 चा गुन्हा देखील दाखल झाला होता. याच गुन्ह्यात खांडे यांना अटक झाली आहे. (Kundlik Khade Remove From Shivsena Party)

मोदी पुन्हा PM झाले; पहिले जयंतराव जयंतराव अन् अचानक शिंदे म्हणाले ‘चादरवाले’ आले

पत्रात नेमकं काय?

संबधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक  झाले होते. बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने  दगडफेक करुन तोडले होते. त्यानंतर आता शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार, शिवसेना मुख्यनेते  एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून पक्ष विरोधी कार्य केल्याबद्दल बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांची शिवसेना पक्षातून हक्कालपट्टी करण्यात येत असल्याचे शिवसेना पक्षाचे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

ते पत्र नाहीच; ते फक्त एक पान; बावनकुळेंच्या स्पष्टोतीने पंकजांसह अनेकांचे टेन्शन वाढलं

प्रकरण काय?

बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली कुंडलिक खांडे देत आहेत. तसंच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली.

कुंडलिक खांडेंना अटक…

दरम्यान, ऑडिओ क्लिप प्रकरणी चर्चेत असलेल्या कुंडलिक खांडे यांना अटक करण्यात आली आहे. ही अटक एका वेगळ्याच प्रकरणात झाली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना दोन महिन्यांपूर्वी मारहाण केल्याप्रकरणी कुंडलिक खांडे यांच्यावर 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात बीड जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला होताय त्यानंतर बीड एलसीबीने त्यांना ताब्यात घेतले आहे.

follow us

वेब स्टोरीज