Latur DCC Bank Election : निलंगेकर कुटुंबात पुन्हा भाऊबंदकी; काकी-पुतण्याची लढत रंगणार !

Latur DCC Bank Election: निलंगा सोसायटी मतदारसंघात संगीता निलंगेकर विरुद्ध अरविंद निलंगेकर अशी काकी-पुतण्याची लढत रंगणार.

Latur Dcc Bank Election

Latur Dcc Bank Election

Latur DCC Bank Election : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Latur DCC Bank Election) निवडणूक जोरदार गाजत असून, यंदा काँग्रेससमोर भाजपने तगडे आव्हान उभे केले आहे. सुरुवातीला बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्नही झाले होते. पण महायुतीने तगडे पॅनल मैदानात उतरवल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः निलंगा तालुक्यात काकी आणि पुतण्यामधील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. माजी मंत्री व भाजपचे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी देशमुखांकडून बँक ताब्यात घेण्यासाठी आक्रमक रणनीती आखली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी महायुतीने केली आहे. एका मतदारसंघात थेट काकी आणि पुतण्यामध्ये लढत होत आहे.

शिरूरमधील बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा तापला; महेबुब शेख यांची थेट निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

निलंग्यात निलंगेकर विरुद्ध निलंगेकर!
निलंगा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात यंदा विशेष चुरस पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या संगीता अशोक पाटील-निलंगेकर आणि भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील-निलंगेकर आमने-सामने आले आहेत. अरविंद पाटील निलंगेकर हे आमदार संभाजी पाटील यांचे सख्ये बंधू आहेत. सलग दहा वर्षे संचालक राहिल्याच्या नियमानुसार अशोक पाटील-निलंगेकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने त्यांच्या पत्नी संगीता पाटील-निलंगेकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. दोघेही नात्याने काकी व पुतणे आहेत. निलंगेकर कुटुंबामध्ये मोठा सर्वच निवडणुकीत राजकीय संघर्ष राहिलेला आहे. आता पुन्हा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तो दिसणार आहे. निलंगा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात एकूण 99 मतदार आहेत. या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

केस उगवण्याचा दावा करणाऱ्या हेअर ऑईलचा 50 लाखांचा साठा जप्त; नाशिकमध्ये FDA ची मोठी कारवाई

निलंगेकर कुटुंबातील अनेक जण जिल्हा बँकेवर
यापूर्वी निलंगेकर कुटुंबातील अनेक सदस्यांना जिल्हा बँकेत महत्त्वाची पदे मिळाली आहेत. कै. दिलीपराव पाटील-निलंगेकर यांना 1997-98 मध्ये बँकेच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर अशोक पाटील-निलंगेकर यांनी संचालक म्हणून काम पाहिले. निलंगा तालुक्यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि इतर सहकारी गटातूनही संचालक निवडले जात होते. या गटातून विजयकुमार पाटील यांना संधी मिळाली होती. 2004 ते 2007 या कालावधीत त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भूषवले होते.

Exit mobile version