Raosaheb Danve : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काल परशुराम जयंतीनिमित्त जालना शहरात आयोजित कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या कार्यक्रमात दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाबाबत भाकित केले.
या कार्यक्रमात ते म्हणाले, ‘मागच्या परशुराम जयंतीला मी उपस्थित होतो. त्यावेळी नगरपालिकेचे चार तिकीट सगळ्या पक्षांनी मिळून का होईना पण ब्राह्मण समाजातील उमेदवारांना मिळावीत’, अशी मागणी मी केली होती.
बॅनरवर शिंदे-फडणवीसांचे फोटो नसल्यानं ठाकरे गट आणि भाजप यांच्यात शाब्दिक वाद
‘मी त्यावेळी असेही सांगितले होते की तुम्ही ब्राह्मण नगरसेवक व्हावा अशी इच्छा व्यक्त करता पण मी तर ब्राह्मण मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त करतो. आणि मी बोललेला शब्द खरा होतो. मी आता पुन्हा पुढील वर्षाचे भाकित करतो की जसे देवेंद्र फडणवीस यावेळी उपमुख्यमंत्री झाले तसे नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा प्रधानमंत्री होतील. त्यावेळी मला तुम्ही परत पुढल्या वर्षी बोलवा मग या सगळ्यांचा फैसला आपण करू. कारण सध्या आमचा फैसला होणार आहे’, असे त्यांनी म्हणताच जोरदार हशा पिकला.
पुढील वर्षात वेळच वेळ
सध्या मला जास्त वेळ नाही. या कार्यक्रमानंतर मला लातूरला जायचे आहे. तेथून पुढे कर्नाटकात जायचे आहे. तेथील निवडणुकीचे काम माझ्याकडे आहे. त्यामुळे सध्या व्यस्त आहे. मात्र, पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात तुम्ही मला नक्की बोलवा त्यावेळी मात्र माझ्याकडे वेळच वेळ आहे, असे दानवे म्हणाले. तसे पाहिले तर पुढील वर्षात लोकसभा आणि राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत दानवे मात्र माझ्याकडे वेळच वेळ असल्याचे म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भावा-बहिणीच पुन्हा बिनसलं…पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा