राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! पुढील चार दिवस पावसाचे; ‘या’ जिल्ह्यांना मिळाला अलर्ट

धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Maharashtra Monsoon

Rain Alert

Maharashtra Rain Alert : राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. पुढील चार दिवसांत काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा (Maharashtra Rain Alert) इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील जनता सध्या हवामानातील चढ उताराचा अनुभव घेत आहे. मार्च महिन्यात रणरणतं ऊन होतं. पण शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला. सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला पण शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. हा अंदाजही खरा ठरला. या महिन्यात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे.

राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचे, ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; हवामानाचा अंदाज काय?

अशी परिस्थिती असताना राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भ आणि मराठवाड्याला पुढील 24 तासांसाठी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांतील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

मराठवाड्यातील धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुढील चार दिवसांत सोलापूर जिल्ह्यात पाऊस हजेरी लावील. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आजपासून बुधवारपर्यंत हलका पाऊस होईल, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्या हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्यात उष्णतेत वाढ होईल असेही हवामान विभागाने सांगितले होते. त्यानुसार या महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. काही भागात तर तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले आहे.

पालकांनो सावधान, मुलांमध्ये वाढतोय ‘या’ आजाराचा धोका; अहवालातून धक्कादायक माहिती..

Exit mobile version