Download App

फडणवीस काड्या करत राहिले तर आम्ही डाव उधळणार; जरांगेंनी डायरेक्ट धमकावलंच

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange on Devendra Fadanvis : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. या सभांमधून ते जोरदार हल्ले करत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्या जरांगे पाटलांनी अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे टीकेचा मोर्चा वळवला आहे. फडणवीस यांनी काड्या करू नये. मराठा आंदोलनाच्या आड येऊ नये, असा इशारा जरांगेंनी दिला.

IND vs SA : पावसामुळे भारत-दक्षिण आफ्रिका पहिला T20 रद्द 

आज माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, आमच्यावर टीका करणारे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे लोक आहेत. फडणवीस हे जाणीवपूर्वक करत असल्याचे दिसते. मराठ्यांनी जरा सावध राहावे. यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. कारण फडणवीस हे100 टक्के मराठ्यांवर गरळ ओकण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण आणणारच. फक्त पुढे काय काय होतं ते पहा. देवेंद्र फडणवीस यांनी अशाच काड्या केल्या तर आणखी काय होतेय ते बघा… देवेंद्र फडणवीस तुमचा डाव आम्ही उधळूनच लावणार आहोत, असा इशारा जरागेंनी दिला.

आता भाजपने सातारा लोकसभेवरून अजितदादांना कोंडीत पकडले ! जागा सोडण्यास उघड विरोध 

जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी आता शहाणं झाले पाहिजे. नाहीतर मी सगळं बाहेर काढणार… मीच घडवून आणतोय, हे त्यांनी उघडपणे सांगावं. त्यांनी आधी मनाचा मोठेपणा दाखवला होता. त्यांनी आता खोडसाळपणा करायला सुरूवात केली. त्यांनी आता आपल्या लोकांना बोलायला सांगितले आहे. फडणवीसांच्या ताटात जेवणारे लोक बरळायला लागलेत. कुणी कितीही जातीयवाद केला तरी ओबीसी मराठा एकत्र आहेत, असंही जरांगे बोलले होते.

राणेंची जरांगेंवर टीका-
जरांगे यांनी केलेल्या टीकेनंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी जरांगेंवर टीका केली. मनोज जरांगे यांना पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तर ती आम्ही कदापि सहन करणार नाही. तुम्ही टीका कराल तर आम्हाला देखील तुमच्या डोक्यात विष भरतंय, तुमची भाषणे कोण लिहित आहेत? तुम्हाला मुस्लीम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय, याही आम्हाला पुराव्यासह यादीच काढावी लागेल. मराठा आरक्षणाबाबत बोलत राहिलात तर आम्ही तुमचे स्वागत करू. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण दिले. मराठा समाजासाठी अनेक योजना जाहीर केल्या. आणि तुम्ही त्यांच्या विरोधात बोलालत तर गाठ मराठ्यांशी आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा नितीश राणे यांनी दिला.

Tags

follow us