Download App

“त्याला कोणी सांगितले श्रीमंतीवरुन आरक्षण? मग तर तू उद्याच बाहेर पडणार” : जरांगेंचे भुजबळांना प्रत्युत्तर

जालना : त्याला कोणी सांगितले श्रीमंतीवर आरक्षण आहे? मग तर तु उद्या सकाळीच बाहेर पडणार. मराठे मोठे कर्ज काढतात, तेवढेच कष्टही करतात आणि वाहन घेतात. आमच्या घामाचे पैसे आहेत. तुझ्यासारखे दोन नंबरचे कमविलेले नाही. लोकांचे पैसे लुबाडले आणि जेलमध्ये गेलेा. तु भानात रहा, असा इशारा देत मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना प्रत्युत्तर दिले. ते जालना इथे माध्यमांशी बोलत होते. (Maratha reservation activist Manoj Jarange Patil responded to minister Chhagan Bhujbal on the issue of reservation.)

काल (6 जानेवारी) पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाकडून ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभांवर कडाडून टीका केली होती. समोरच्यांच्या लोकांच्या मागण्या खूप आहेत. त्यांची लेकर-बाळ गरीब आहेत. म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे. पण त्यांच्याकडेच 200 जेसीबी आहेत. तेही फुलं उधळण्यासाठी हेलिकॉप्टरमधूनही फुलांचा वर्षाव केला जातोय. पण ते गरीब आहेत. असं म्हणत भुजबळांनी जरांगेंच्या भव्यसभांवरती टोला लगावला होता.

“शरद मोहोळ हिंदुत्ववादी होता, म्हणून त्याची हत्या…” : भाजप आमदाराची मुक्ताफळे

यावर प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, त्याला कोणी सांगितले श्रीमंतीवर आरक्षण आहे? मग तर तु उद्या सकाळीच बाहेर पडणार. मराठे मोठे कर्ज काढतात, तेवढेच कष्टही करतात आणि वाहन घेतात. आमच्या घामाचे पैसे आहेत. तुझ्यासारखे दोन नंबरचे कमविलेले नाही. लोकांचे पैसे लुबाडले आणि जेलमध्ये गेलेा. तु भानात रहा. आमच्या लोकांना 70-70 वर्षांपासून आरक्षण नव्हते. लोक पिचलेत आमचे. आमच्या लोकांनी खूप त्रास सहन केला. आता त्यांना आरक्षण मिळत आहे, त्यामुळे ते आनंदात आहेत.

ती वाहन काहींनी भाड्याने आणलेली असतात, काहींनी कर्जातून घेतलेली असतात. तुझे इतके वाईट विचार आहेत, त्यामुळे इतकी वाईट वेळी आली आणि इथून पुढच्या दिवसात याहुन वाईट वेळ येणार आहे. 100 टक्के पागल होणार आहे, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली. तसेच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, या भुजबळांच्या दाव्यावर जरांगे पाटील म्हणाले, आम्ही घेऊनच दाखविणार आणि ओबीसीतूनच घेऊन दाखविणार, असे प्रतिआव्हान दिले.

Chhagan Bhujbal : ओबीसी आयोग की, मराठा आयोग माझ्या मनात शंका; भुजबळांनी केला सवाल

छगन भुजबळ यांचा आयोगावर सवाल :

काल मेळाव्यात भुजबळ यांनी ओबीसी आयोगावर सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, तो ओबीसी आयोग आहे की, मराठा आयोग आहे. याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण ओबीसी आयोगातील पूर्वीच्या सर्व लोकांनी राजीनामे दिले आहेत. आता नवीन आलेल्या लोकांना काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणावर काम करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र आमचा मराठा आरक्षणाला विरोध नसून आरक्षणाच्या नावाखालीच सुरू असलेल्या झुंडशाहीला आमचा विरोध आहे. असं म्हणत यावेळी भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

follow us

वेब स्टोरीज