एमजीएम विद्यापिठात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचं वाटप करत आमदार गायकवाडांचा निषेध

प्रकाशकाला दिलेल्या कथित धमक्या आणि केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

News Photo   2026 04 25T200953.994

एमजीएम विद्यापिठात 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचं वाटप करत आमदार गायकवाडांचा निषेध

गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकासंदर्भात उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ एकत्र येत जाहीर निषेध नोंदवला. संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या कथित धमक्या आणि केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

एमजीएम युनिव्हर्सिटीतील चिंतनगाह येथे दुपारी 4 वाजता आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी “विचारांना उत्तर विचारांनीच दिले पाहिजे” असा ठाम संदेश दिला. विद्यार्थी प्रतिनिधी विठ्ठल निर्मळ यांनी आपले मत व्यक्त करताना, मतभेद व्यक्त करताना शिवीगाळ किंवा धमक्या देण्याऐवजी विवेकपूर्ण संवादाची गरज अधोरेखित केली.

छत्रपती शिवाजी महाराज युद्धात थकले अन् त्यांनी रामदास स्वामींच्या पुढे; बागेश्वर बाबांचं आणखी एक वादग्रस्त विधान

कार्यक्रमास कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडिया च्या प्राचार्या रेखा शेळके, एम जी एम एस डी जी ॲक्शन लॅब चे प्रकल्प समन्यवक श्री. सचिन चौधरी, प्रा. आशा देशपांडे, आणि इतर प्राध्यापक मंडळी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुस्तक वाचनाची सवय जोपासण्याचा सल्ला दिला आणि विषय समजून घेऊन मत मांडण्याचे महत्त्व पटवून दिले.

यानंतर “शिवाजी कोण होता” या पुस्तकाचे सार्वजनिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी इच्छुकांना पुस्तकांचे विनामूल्य वितरणही करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

Exit mobile version