Suresh Dhas : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. घटनेला 24 दिवस उलटून गेल्यानंतरही या प्रकरणातील काही आरोपी अद्याप आहेत. तर तीन दिवसांपूर्वी वाल्मिक कराड (Walmik Karad) याने सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं. दरम्यान, कराड याचे मंत्री धनंजय मुंडेंशी (Dhananjay Munde) जवळीकता असल्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर सुरेश धस (Suresh Dhas) यांनी भाष्य केलं.
‘वामा-लढाई सन्मानाची’ चं चित्रीकरण पूर्ण; गौतमी पाटीलचं आयटम सॉंग लक्षवेधी
सुरेश धस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना धस म्हणाले, त्यांच्याच पक्षातील लोक म्हणत आहेत. मी अद्याप राजीनामा मागितलेला नाही. मात्र प्रकाश सोळंके हे जिल्ह्यातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की यांचा राजीनामा घ्या… कुणाला संधी देऊ नका. एखादं मंत्रीपद रिक्त राहू द्या. एक जागा रिक्त राहिली तर काही फरक फडतो का? असा सवाल त्यांनी केला.
बीडचे पालकमंत्री कोण असावेत?
पुढं ते म्हणाले की, बीडच्या पालकमंत्रिपदासाठी आमची पहिली पसंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार झाले तरी चालतील. आम्हाला काही अडचण नाही. अजित पवार आमचा जिल्हा सुतासाऱखा सुरळ करतील. मी अजितदादासोबत काम केले आहे. त्यांना वेड्या गोष्टी आवडत नाहीत, असं धस म्हणाले.
ते म्हणाले की, मी उद्या परभणीच्या आणि परवा पुणेच्या मोर्चालाही जाणार आहे. 6 तारखेला राज्यपालांकडे चला असं सांगत आहेत, मी पण तिथे जात आहे. इथे पक्षाचा मुद्दा नाही. ही घटना भीषण आहे, असं धस म्हणाले.
ते माणसं आकानेच पाठवले…
या प्रकरणात एका कंपनीकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी 50 लाख रुपये दिले गेले आहेत. दीड कोटी रुपये राहिले आहेत. दीड कोटी रुपये राहिले तर माणसं कोणी पाठवले. ते माणसं डायरेक्ट आकानेच पाठवले. आकानेच सांगितलं होतं. आकानेच सांगितल्यावर हे लोक शुक्रवारी तिथं गेले होते. आता सीडीआर बाहेर काढल्यावर कोण कुणाला काय बोललं बोललं हे सर्व बाहेर येईल, त्यामुळं मला नाही वाटत की, आका यातून बाहेर राहतील, सुरेश धस म्हणाले.
बकरी की मा कब तक दुआ मांगेली. सगळा फोकस हा आता आका पकडण्याकडे गेल्यामुळं इतर राहिले असावेत. उर्वरित आरोपीही लवकरात लवकर पकडले जातील. तेसुध्दा आतमध्ये जातील. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, यात मी कुणालाही सोडणार नाही. त्यावर लोकांचा विश्वास आहे, असं धस म्हणाले.