Download App

पालकमंत्री ताई अन् भाऊ कोणीही असो फरक नाही पडत; बजरंग सोनवणेंनी क्लिअर सांगितलं

बीड जिल्ह्याचा पालकमंत्री ताई अन् भाऊ कोणीही असो फरक पडत नाही, त्यांच्या काळतच किती गुन्हे झालेत तपासा, या शब्दांत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी क्लिअर सांगितलंय.

MP Bajarang Sonawane : बीड जिल्ह्याचा पालकमंत्री ताई अन् भाऊ कोणीही असो फरक पडत नाही, त्यांच्या काळतच किती गुन्हे झालेत तपासा, या शब्दांत बीडचे खासदार बजरंग सोनवणे (MP Bajarang Sonawane) यांनी क्लिअर सांगितलंय. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यात चांगलच चर्चेत असून या मुद्द्यावर बोलताना सोनवणे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांच्यावर सडकून टीका केलीयं.

पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही आता युनिक आयडी, विकास मंडळे आयटी प्लॅटफॉर्मवर, फडणवीसांचा नेमका प्लॅन काय?

खासदार सोनवणे म्हणाले, बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री धनंजय मुंडे भाऊ काय आणि ताई पंकजा मुंडे झाल्या तरीही काहीही फरक पडणार नाही. कारण त्यांच्या काळातच किती गुन्हे झालेले आहेत, हे तपासा मी तर म्हणतोयं की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच व्हावं, असं खासदार सोनवणे यांनी स्पष्ट केलंय.

बीडमध्ये घडत असलेल्या गुन्ह्यांच्या घटनांवरुन संपूर्ण राज्यात चांगलच वातावरण तापल्याचं चित्र आहे. अशातच विरोधकांकडून थेट विधानसभेत आवाज उठवण्या येत आहे. बीडमधील गुन्हेगारी कमी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जिल्ह्याचं पालकत्व स्विकारावं, अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. त्यात आता बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांनीच पालकमंत्री व्हावं, असं म्हटलंय.

अमृताचं विलक्षण नृत्य! संगीत मानापमानमध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं “वंदन हो” गाणं

वाल्मिक कराडला मदत करणाऱ्यांवरही कारवाई करा…
वाल्मिक कराड फरार असताना त्याला ज्याने कोणी मदत केलीयं, त्याच्यावरही कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची मागणी यावेळी बजरंग सोनवणे यांनी केलीयं.

अमेरिकन कोर्टात भारताचा मोठा विजय! मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला कोर्टाचा दणका

फडणवीसांच्या भेटीनंतरच कराड शरण जातो अन् एसआयटी..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्यानंतरच वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयासमोर शरण येतो. त्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एसआयटीची स्थापना करतात. या 9 जणांच्या एसआयटीमध्ये बीड स्थानिक गुन्हे शाखेत काम करुन गेलेल्या अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करण्यात आलीयं. त्यांना दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकारी मिळत नाहीत का? म्हणजे ज्यांनी या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती तेच अधिकारी आता यांची चौकशी करणार असल्याचा गंभीर आरोपही बजरंग सोनवणे यांनी यावेळी बोलताना केलायं.

follow us