Download App

Video : ….तर राज्यचं एका खटक्यात बंद करणार; पवारांच्या आमदारांसमोर जरांगेंनी भरला दम

मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला. यामुळे महाराष्ट्र शांत आहे. परंतु

  • Written By: Last Updated:

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढळवून निघालेले असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना थेट राज्यचं बंद करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. ते मस्साजोगमध्ये बोलत होते. यावेळी जरांगेंनी कराडची टोळी कशी उभी राहिली असा प्रश्न उपस्थित करत या घटनेत एकही आरोपी सुटला तर, एका मिनिटात राज्य बंद करून टाकेन असा इशारा दिला आहे. यावेळी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनावणे हे देखील उपस्थित होते. वाल्मिक कराड खंडणीतला आरोपी आहे. तो मोदींपेक्षा मोठा लागला की काय. त्याला 302 मध्ये आरोपी करू शकत नाही, अशी टीकाही केली

तुम्ही खाली या! संतोष देशमुखांच्या भावाला विनवणी करताना जरांगे धाय मोकलून रडले

…तर तुम्ही आजच अपयशी झाला आहात

मुख्यमंत्री साहेब तुमचे चुकीच पाऊल पडायला लागला आहे, जोपर्यंत तुमचे पाऊल चुकीच पडत नव्हते तेव्हा समाज शांत होता. मुख्यमंत्री तुम्हाला भेटून देशमुख कुटुंबीय हाताश होत असेल तर तुम्ही आजच अपयशी झाला आहात. तुमचे सरकार खंडणी खोर चालवतो की काय अशा पद्धतीने वागत असल्याचेही जरांगे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला. यामुळे महाराष्ट्र शांत आहे. परंतु तपास यंत्रणेचे हात बांधलेली आहे की काय अशी शंका येत आहे. आता सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जात नाही. ती आजच देण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. खंडणीमुळे हा खून झाला आहे. हा विषय सरळ आहे.

 

follow us