Download App

मुंडे बहिण-भावांनी जबरदस्ती करून कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावाने घेतली, सारंगी महाजनांचा आरोप

दोन्ही मुंडे बहीण-भावांनी धाक दाखवून आणि कट कारस्थान रचून जबरदस्तीने कोट्यवधी रुपयांची जमीन कवडीमोल भावाने खेरदी केली

  • Written By: Last Updated:

Sarangi Mahajan : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर दिवंगत नेते प्रवीण महाजन (Praveen Mahajan) यांच्या पत्नी सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी गंभीर आरोप केले. दोन्ही मुंडे बहीण-भावांनी धाक दाखवून आणि कट कारस्थान रचून जबरदस्तीने कोट्यवधी रुपयांची जमीन कवडीमोल भावाने खेरदी केल्याचा आरोप त्यांनी केला.

अमरावतीत राजकारण तापले! यशोमती ठाकूरांचा नवनीत राणांवर हल्लाबोल, ‘आमच्या वहिनीने कधी संस्कार पाहिले नाहीत…’ 

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या नावे असेली बीड जिल्ह्यातील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील 36.50 कोटी रुपयांची जमीन जबरदस्तीन घेतली, असं सांरगी महाजन म्हणाल्या. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले. सारंगी महाजन यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माझ्या हिंदू बांधवांनो पाठिशी ठामपणे उभे रहा; राज ठाकरेंनीही काढला फतवा 

सांरगी महाजन म्हणाल्या, माझी परळीत 63.50 आर जमीन होती, 36 आर जमीन फसवणूक करून विकली. मला परळीच्या अनुसया हॉटेलमध्ये बोलावून घेतलं. मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसला नेले. तिकडे माझ्याकडून सही करून घेण्यात आली. कोणी जमीन घेतली, हे आम्हाला माहिती नाही. तेथून गोविंद बालाजी मुंडे यांनी आम्हाला घरी नेऊन जेवू घातले. यानंतर कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या. त्याला मी विरोध केला असता त्याने म्हटलं की, सही केल्याशिवाय, धनुभाऊ परळी सोडू देणार नाहीत, अशी धमकी दिल्याचं सांरगी महाजन यांनी म्हटलं.

तर गोविंद मुंडे यांनी हा व्यवहार महाजन कुटुंबीयांच्या संमतीने झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, सारंगी महाजन यांनी केलेल्या आरोपाना आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय उत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

follow us