नांदेड : काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री रजनी शंकरराव सातव ( Rajani Satav) यांचे निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ह्दयविकाराचा झटका येऊन त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत्या.
रजनी सातव यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी दुपारी कळमनुरी (हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. रजनी सातव यांच्या पश्चात सून आमदार डॉ. प्रज्ञा सातव, दोन नातवंडे असा परिवार आहे.
राजकीय कारकीर्द
रजनी सातव या 1980 ते 1990 या काळात कळमनुरीतून विधानसभेत गेल्या होत्या. तर 1994 ते 2000 दरम्यान स्थानिक स्वराज संस्थेतून ते विधानपरिषदेच्या आमदार होत्या. त्यांनी आरोग्य राज्यमंत्रीपद भूषवलेले होते. काँग्रेस प्रदेश संघटनेतही त्या कार्यरत होत्या.
दिवंगत काँग्रेस नेते राजीवजी सातव यांच्या मातोश्री महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री,राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा अॅड.रजनीताई सातव यांचे ह्रदय विकाराने आज दुःखद निधन झाले.आमदार डॅाक्टर प्रज्ञाताई सातव आणि संपूर्ण सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.… pic.twitter.com/KteXiJbFzL
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 18, 2024