Ambadas Danve : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित संस्थेला कवडीमोल दरात भूखंड दिल्याचे प्रकरण ताजे असतानात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दुसरा (Ambadas Danve) गंभीर आरोप राज्य सरकारवर केला आहे. राज्यातील 30 एमआयडीसी रिसॉर्टच्या इमारती आणि जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव आहे, असा आरोप दानवेंनी केला आहे. दानवे यांनी नुसते आरोप केले नाहीत तर थेट यादीच ट्विट केली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
अंबादास दानवेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर (Girish Mahajan) टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक यादी शेअर केली आहे. तसेच त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, भर अब्दुल्ला गुड थैली में चा अंक दुसरा!
बावनकुळे भूखंड प्रकरण ताजे असतानाच आता राज्यातील तब्बल 30 एमटीडीसी रिसॉर्टच्या इमारती मोकळ्या जमिनींसह बिल्डरांच्या भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव आज जागतिक पर्यटन दिनी राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने मांडला आहे.
या खासगीकरणाने पहिल्या टप्प्यात 46 अधिकारी कर्मचारी (11 ऑक्टोबर 2024 पासून) आणि इतर 200 इतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी मराठी मुलीमुलींची नोकरी खाल्ली आहे. एवढ्यावरच ही लूट थांबत नाही तर या खासगी उद्योजकांना 20 टक्के कॅपिटल सबसिडी, 5 ते 15 वर्षे जीएसटी परतावा, स्टँप ड्युटीवर भरघोस सूट, कर्ज घेण्यास हमी ही खैरात करण्यात आली आहे.
‘भर अब्दुल्ला गुड थैली में’ चा अंक दुसरा!
बावनकुळे भूखंड प्रकरण ताजे असतानाच आता राज्यातील तब्बल ३० एमटीडीसी रिसॉर्टच्या इमारती मोकळ्या जमिनींसह बिल्डरांच्या/भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव आज जागतिक पर्यटन दिनी राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने मांडला आहे. याने हे रिसॉर्ट… pic.twitter.com/fjFN6B4Rnk
— Ambadas Danve (@iambadasdanve) September 27, 2024
1994 साली चिकलदरा येथील रिसॉर्टसाठी कर्जास एमटीडीसीने हमी दिली. परतफेड न केल्याने येथील रिसॉर्ट खासगी मालकाच्या घशात गेले असताना हा स्वस्तात जमिनी लाटण्याचा प्रकार सरकारने चालवला आहे.
जागतिक पर्यटन दिनी भूखंड माफियांना सरकारने घेऊन दिलेले दिवाळीचे हे फटाके आहेत. उडवा आणि विसरून जा.. प्रॉफिटमधील प्रचंड मोठ्या शासकीय मालमत्ता कोणाच्या घशात घालायच्या याचे उत्तर पर्यटनात शून्य इंटरेस्ट असलेले पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी जाहीरपणे द्यायला हवे असे आव्हान विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे.