Download App

दौलताबादच्या किल्ल्याला आग ही धोक्याची घटना; सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहीत सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule यांनी देवगिरी किल्ला परिसरातील आगीवर सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहीत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Supriya Sule Letter to Cultural Minister for Daulatabad fort Fire : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याच्या परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील झाडं आणि मोठ्या प्रमाणांत गवत जळून खाक झाले होते. तसेच या आगीचे लोट किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहचल्याने ऐतिहासिक वास्तूला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे यावर सांस्कृतिक मंत्रालयाकडून पावलं उचलण्याची गरज आहे. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहीत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

8 एप्रिल 2025 ऐतिहासिक देवगिरी कल्ल्याच्या परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली होती. अनावश्यक झाडं-झुडप आणि प्रशासकिय हलगर्जीपणामुळे लागली होती. हा किल्ला एक संरक्षण दिलेली वास्तू आहे तरी देखील येथे अग्निशमन उपाय नाही. त्यामुळे मी सांस्कृतिक मंत्र्यांना विनंती करते की, मी या पत्रामध्ये काही उपाय सुचवले आहेत त्यावर विचार करावा.

48 तासांचा अल्टीमेटम; मुंबई पाणीप्रश्नावर आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा

तर या पत्रामध्ये सुळे म्हणाल्या आहेत की, देवगिरी किल्ल्याच्या परिसरामध्ये वारंवार लागण्याऱ्या आगीला कारण ठरणाऱ्या वाळलेले गवत आणि अनावश्यक झाडं-झुडपं कमी करण्याची गरज आहे. तसेच किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी देखील काळजी घ्यावी कारण त्यांच्याकडे असलेल्या ज्वालाग्राही पदार्थांमुळे आगीच्या घटना घडण्याची शक्यता असते. तसेच या ठिकाणी आग लागल्यानंतर किंवा लागू नये यासाठी अग्निशमनासाठी लागणाऱ्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

follow us