The kute group chairman Suresh Kute arrested: राज्यात आतापर्यंत अनेक पतसंस्था, मल्टिस्टेट बँकांनी ठेवीदारांचे पैसे बुडविले आहेत. कोट्यवधी रुपये बुडल्याने ठेवीदार हे उघडावर आले आहेत. या बँकांचे काही संचालक अटकेत आहेत. तर काही संचालक हे फरार आहे. बीडमध्ये नावारुपाला आलेल्या ज्ञानराधा (Dnyanraddha Multistate) मल्टिस्टेटमध्ये ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये अडकलेत. जिल्ह्यातील पहिलीच मल्टिस्टेट बँक असा गाजावाजा मिरवणारे सुरेश कुटे (Suresh Kute) व त्यांची पत्नी अर्चना कुटे व इतर संचालक हे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. तर सुरेश कुटे व त्यांचा भाचा व संचालक आशिष पाटोदकर या दोघांना अटक झाली आहे. हे दोघे आता पोलिस कोठडीत आहे. बीडसारख्या जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी व द कुटे ग्रुप नावाने तिरुमला उद्योग समूह चालविणारे सुरेश कुटे हे लोकांच्या गळ्यातील ताईत ठरले होते. एक मोठा उद्योजक म्हणून त्यांना मानसन्मान मिळत होता. परंतु आता ठेवीदारांचे पैसे अडकले आहे. केवळ आश्वासनाने मिळून ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने ते आता कुटे दामप्त्याला शिवा देत आहे. याबाबत जाणून घेऊया….
निवडणुकीचा वाद टोकाला ! लंके समर्थक राहुल झावरेंसह 24 जणांविरुद्ध विनयभंग, अॅट्रासिटीचा गुन्हा
आई-वडिल्यांच्या नावाने पतसंस्था
सुरेश कुटे यांनी आपल्या आई व वडिलांच्या नावावर ज्ञानराधा हे पतसंस्था सुरू केली होती. या पतसंस्थांची भरभराट झाल्यानंतर तिला मल्टिस्टेट को-ऑपरटिव्ह सोसायटीचा दर्जा मिळाला. विशेष म्हणजे बीडमधील मल्टिस्टेट सोसायटीचा दर्जा मिळालेली पहिलेच संस्था होती. जास्त व्याज मिळत असल्याने ठेवीदार या संस्थेकडून आकर्षित झाले होते. या संस्थेच्या बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांत तब्बल 52 लाख शाखा आहेत.
आयकर विभागाची छापेमारी आणि दिवस फिरले !
कुटे दाम्पत्याने बँकिंग क्षेत्रात यश मिळविलेच पण त्यांनी बीडसारख्या ठिकाणी तिरुमला उद्योग समूहाची स्थापना केली. या कंपनीचे अनेक उत्पादने आहेत. खाद्यतेल, दुग्ध जन्य पदार्थ, हेअर ऑईल, वाहनांचे सुटे पार्ट आणि जनावरांसाठी लागणारी पेंड तयार केली जाते. त्यामुळे ही कंपनी राज्यात अनेक देशात नावारुपाला आली होती. ग्रामीण भागात बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने कुटे हे लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. परंतु गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तिरुमला उद्योग समूह आयकर विभागाच्या रडारवर आला. या विभागाने कंपनी, मल्टिस्टेटच्या बीड, पुणे, सोलापूर, फलटण, संभाजीनगर येथील कार्यालयांवर छापे मारले. त्यानंतर कुटे दाम्पत्य आर्थिक अडचणीत आले. ज्ञानराधाचे ठेवीदारांचे पैसे अडकले.
मोदींच्या शपथविधी पूर्वीच शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंना मोठी जबाबदारी, दिसणार नवीन भूमिकेत
भाजपमध्ये गेले पण
तिरुमला ग्रुपवर छापेमारी झाल्यानंतर सुरेश कुटे व अर्चना कुटे यांनी राजकीय आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. कुटे दामप्त्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भाजप प्रवेश केला होता. त्यामुळे आपल्यावर संकटे कमी होतील, असे त्यांना वाटत होते. परंतु तसे काही झाले नाही.
ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये अडकले
ज्ञानराधा मल्टिस्टेमध्ये सुमारे सहा लाखांहून अधिक ठेवीदारांचे तीन हजार कोटी रुपये अडकले आहे. शाखा बंद झाल्यानंतर ठेवीदार हे हवालदिल झाले. कुटे हे काही दिवस ठेवीदारांच्या संपर्कात नव्हते. फेसबुकवरून लाइव्ह करून ठेवीदारांचे पैसे दिले जातील, कुणाचे एकही रुपया ठेवणार नाही, असा विश्वास ते दाखवत होते. 52 शाखांपैकी निम्माहून अधिक शाखा बंद केल्या आहेत. त्यांनी ठेवीदारांना चेकही दिले होते. हे चेक पुढील काही महिन्यांचे होते. परंतु लोकांना पैसे मिळत नव्हते. ज्ञानराधाचे मल्टिस्टेटच्या संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अनेकदा पोलिस ठाण्यात अर्जही दिले. परंतु गुन्हा दाखल नव्हता. तर सुरेश कुटेही ठेवीदारांना पैसे परत करण्यासाठी फेसबूकवरून तारीख तारीख देत होते. पैसे मिळत नसल्याने ठेवीदार हे अखेर न्यायालयात गेले. न्यायालयाचा आदेशानुसार संस्थेच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्यात आले. गुन्हाही नोंदविण्यात आला. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.
आर्थिक गुन्हे शाखेच्या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात सापडला पासपोर्ट
बीडमधील जिजाऊ पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणात एक कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे हा अडकला होता. त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आढळून आली. त्याच्या घरझडतीमध्ये ज्ञानराधाचे सुरेश कुटे याचा पासपोर्ट खाडे याच्याकडे आढळून आला आहे. सुरेश कुटे यांनी हा पासपोर्ट पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा केला होता. कुटे हे परदेशात पळून जावून शकतात, या संशयातून पासपोर्ट हा जमा करून घेण्यात आला होता. परंतु खाडे यांच्या घरात सापडल्याने गोंधळ उडाला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बीडमध्ये नव्हते. ते पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीड पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने सुरेश कुटे व त्यांचा भाचा यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आता दोघेही 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.