Download App

निवडणुकीचा वाद टोकाला ! लंके समर्थक राहुल झावरेंसह 24 जणांविरुद्ध विनयभंग, अॅट्रासिटीचा गुन्हा

घाबरलेलो असल्याने आम्ही आमचे गाव सोडून निघून गेलो. त्यानंतर नगरला तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

अहमदनगरः लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) समर्थक व माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) समर्थक यांच्यात वाद टोकाला गेले आहेत. त्यातून एकमेंकाविरोधात गुन्हेही दाखल होत आहेत. दोन दिवसांपूर्वी लंके समर्थक राहुल झावरेवर (Rahul Zaware) यांच्यावर हल्ला झाला होता. याप्रकरणी सुजय विखे समर्थकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर आता राहुल झावरेंसह 24 जणांविरुद्ध महिलेला मारहाण करणे, तिचा विनयभंग करणे, तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देणे, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आनंदाची बातमी! राज्यातील ‘या’ भागात 3 दिवसांत दाखल होणार मान्सून; होणार मुसळधार पाऊस

लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर गुरुवारी जीवघेणा हल्ला झाला. याप्रकरणी विखे समर्थक माजी नगराध्यक्ष विजय औटी, नंदु औटी यांच्यासह बारा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कलम 307 व आर्म अॅक्टनुसार पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर आता राहुल झावरे व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील एका 21 वर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा प्रचार केला म्हणून गुरुवारी सकाळी राहुल झावरे व इतर 23 जण चार वाहनांतून आमच्या घरी आले. त्यातील राहुल झावरे याने मला ढकलून दिले आहे. तसेच माझा ड्रेस फाडून लज्जास्पद वर्तन केले आहे. त्यावेळी दीपक लंके म्हणाला तुला मराठ्याचा भेटला का असू म्हणूने मला जातीवाचक शिविगाळ केली. तसेच संदीप चौधरी यानेही जातीवाचाक शिवागाळ केली. त्यांच्यात हातात शस्त्र होते. तुझा नवरा कुठे आहे ते मला विचारत होते. त्यावेळी माझा नवरा घरी नाही, असे सांगितले. माझा नवरा घरात लपून बसला होता. तर माझे सासू-सासरे यांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले. तरी ते शिवागीळ करत होते.

फडणवीसांनंतर गिरीश महाजन होणार उपमुख्यमंत्री? केला मोठा खुलासा,म्हणाले…

घाबरलेली असल्याने आम्ही आमचे गाव सोडून निघून गेलो. त्यानंतर नगरला तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून राहुल झावरे, प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजू तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदु दळवी, किरण ठुबे, रामा तारळ, जितेश सरडे, कारभारी पोटघन, दादा शिंदे, बापू शिर्के, बाजीराव कारखिले, किशोर ठुबे, सचिन ठुबे, दीपक लंके, दत्ता ठाणे, लखन ठाणगे, अक्षय चेडे, बंटी दाते, गंधाक्ते यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्याद देणाऱ्या महिलेचे आंतरजातीय विवाह झालेला असून, ती गर्भवती आहे.


हल्ल्यानंतर भाजप आक्रमक

घरात घुसून गर्भवती महिलेवर केलेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासानाने गंभीर दखल घेवून कारवाई करावी आशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. निवडणुकीतील पराभव आम्ही स्वीकारला, तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेवू नका आशा शब्दात भाजपा पदाधिकार्यांनी निलेश लंके यांचा समाचार घेतला. महायुतीचे उमेदवार डाॅ सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून मागील दोन तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या घटना घडत आहे.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी निवडणूक झाली आम्ही पराभव स्वीकारला आहे. पण तुम्ही विजयाचा आनंद साजरा करताना त्रास देण्याची भूमिका घेवू नका तुमच्या कार्यकर्त्यांना आवर घाला कायम मारून टाकण्याच्या धमक्या देता तुमच्याकडे गोळ्या तरी किती आहेत, असा सवाल भालसिंग यांनी पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेवून या घटनेतील सहभागी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली. भाजपाच्या प्रदेश कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.महायुतीच्या बाजूने काम केल्याचा राग मनात धरून मागील काही दिवसांपासून लंके समर्थकांकडून विखे समर्थक कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून धमकावले जात आहे.दोन तीन दिवसांपासून हे प्रकार घडत आहेत.काल घरांवर दगडफेक आणि गाड्या फोडण्याच्या घटनाही घडल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यामध्ये संताप व्यक्त होत आहे.

follow us

वेब स्टोरीज