आनंदाची बातमी! राज्यातील ‘या’ भागात 3 दिवसांत दाखल होणार मान्सून; होणार मुसळधार पाऊस

आनंदाची बातमी! राज्यातील ‘या’ भागात 3 दिवसांत दाखल होणार मान्सून; होणार मुसळधार पाऊस

Monsoon 2024 Update : मे 2024 च्या अखेरीस महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागासह केरळमध्ये मान्सून (Monsoon 2024) दाखल झाला असून आता संपूर्ण राज्यात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात मान्सून मुंबईसह राज्यातील इतर भागात दाखल होणार आहे.

याबाबत भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3-4 दिवसांत मध्य अरबी समुद्राचा (Arabian Sea) आणखी काही भागात तसेच महाराष्ट्रातील मुंबईसह काही भागात, तेलंगणा, कोस्टल आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग, दक्षिण छत्तीसगड आणि नैऋत्य मान्सून दक्षिण ओडिशाच्या काही भागात, पश्चिम बंगालचा उर्वरित भाग आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून दाखल होणार आहे.

तर यापूर्वी केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशात मान्सून दाखल झाले असून महाराष्ट्रातील काही भागात काल (6 जून) मान्सूनचे आगमन झाले आहे.  गेल्या महिन्याच्या अखेरीस ईशान्येकडील राज्यांमध्येही मान्सून दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

याच बरोबर मान्सून येत्या काही दिवसांत उत्तर भारतासह इतर राज्यांत पोहोचण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, गुजरातमध्ये 20 आणि 25 जून दरम्यान मान्सून दाखल होणार आहे तर राजस्थानमध्ये 30 जून आणि 5 जुलै दरम्यान मान्सून दाखल होणार आहे.

फडणवीसांनंतर गिरीश महाजन होणार उपमुख्यमंत्री? केला मोठा खुलासा,म्हणाले…

याशिवाय मध्यप्रदेशातील काही भागात 15 जूनपर्यंत मान्सून येणार आहे तर उर्वरित भागात 20 जूनला पोहोचेल आणि उत्तर प्रदेशमध्ये 15 ते 20 जून दरम्यान मान्सून ची एंट्री होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

नाशिकमध्ये राडा! आमदार किशोर दराडेंकडून अपक्ष उमेदवार दराडेंना मारहाण

follow us
  • fb
  • instagram
  • youtube