Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती; मुंबईसह कोकणाला सतर्कतेचा इशारा

Cyclon

Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील 24 तासांत या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि पुढील 48 तासांत ते आणखी वाढू शकते. या प्रणालीतील वारे घड्याळाच्या उलट दिशेने वाहणारे असतील. यामुळं किनारपट्टीवरील आर्द्रता वाढून आठवड्याच्या अखेरीस कोकणात पाऊस पडू शकतो, असा अंदाज पुणे येथील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला होता. ( Cyclone Biparjoy in Arabian Sea Alert to Mumbai and Kokan )

त्यानुसार आता अरबी समुद्रात प्रतितास 11 किलोमीटर इतक्या वेगाचे वादळ निर्माण झाले आहे. हे वादळ उत्तरेकडे सरकत असून पुढील 12 तासांत याची तीव्रता आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हे वादळ अरबी समुद्रात खोल असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही. मात्र किनारपट्टीवरील लोक आणि मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं अवाहन हवामान विभागाने केलं आहे.

या चक्रिवादळाला बांग्लादेशने बिपरजॉय असं नाव देण्यात आलं आहे. मुंबईपासून 1120 किलोमीटर अंतरावर हे वादळ निर्माण झालं ते ठिकाण आहे. याबद्दल पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, पूर्वमध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात चार-पाच दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता कठीण

दरम्यान ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. एम. राजीवन म्हणाले, ‘7 ते 8 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र सुरुवातीला उत्तरेकडे सरकण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे मान्सूनचा प्रवाह तीव्र होऊ शकतो आणि मान्सूनची प्रगती पुन्हा सुरू होऊ शकते. हे मॉडेल 8 जून दरम्यान केरळमध्ये चांगल्या पावसाची शक्यता दर्शवते, असं त्यांनी सांगितलं.

Monsoon Rain : केरळात आजच, महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून धडकणार!

Tags

follow us