आनंदवार्ता..! मान्सूनची भारतात एन्ट्री; केरळ अन् ईशान्य भारतात एकत्रच वर्दी

आनंदवार्ता..! मान्सूनची भारतात एन्ट्री; केरळ अन् ईशान्य भारतात एकत्रच वर्दी

Monsoon in India : कडाक्याच्या उन्हात होरपळून निघालेल्या देशवासियांना अखेर आनंदवार्ता मिळाली आहे. ज्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो मान्सून आज भारतभूमीत प्रवेश करता झाला. दक्षिणेतील केरळ राज्यात आज मान्सूनने एन्ट्री घेतली. मान्सूनच्या आगमनानंतर येथील हवामामात मोठा बदल झाला. आता हा मान्सून पूर्वोत्तर भारताच्या बहुतांश भागात पुढे सरकू लागला आहे. रेमल चक्रीवादळामुळे पूर्वोत्तर भारतात वेळेआधीच मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे.

मान्सून अंदमानमध्ये दाखल होताच वातावरण बदललं; विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाल आहे. यामुळे राज्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेमल चक्रीवादळाने धडक दिली होती. त्याचा परिणाम म्हणून मान्सूनचा वेग वाढला होता. मान्सून वेगाने बंगालच्या खाडीकडे पोहोचला. याच कारणामुळे मान्सून आता वेगाने पूर्वोत्तर राज्यांकडे मार्गक्रमण करू लागला आहे. रेमल वादळामुळे शनिवारपासूनच पश्चिम बंगाल, ओडिशासह पूर्वोत्तर भारतातील राज्यांत जोरदार पाऊस होताना दिसत आहे.

आयएमडी बुधवारी स्पष्ट केले होते की दक्षिण पश्चिम मान्सून केरळमध्ये दाखल होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मान्सून वेळेआधीच दाखल होऊ शकतो असा अंदाजही विभागाने व्यक्त केला होता. 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये येईल असे सांगण्यात आले होते. मात्र एक दिवस आधीच मान्सून केरळात दाखल झाला. याचा परिणाम म्हणून केरळमध्ये अनेक ठिकाणी बुधवारपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोच्ची आणि तिरुवनंतपूरम शहरांत पावसामुळे ठीकठिकाणी पाणी जमा होऊ लागले आहे.

पूर्वोत्तर भारतात कधी होणार मान्सूनची एन्ट्री

साधारणपणे अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाम या राज्यांत मान्सूनचा एन्ट्री 5 जूनपासून होते. परंतु, मान्सूनची सध्याची गती पाहता पुढील एक दोन दिवसांतच मान्सून या भागात दाखल होण्याची शक्यता आहे. आयएमडीने असा अंदाज व्यक्त केला आहे की दक्षिण अरब समुद्र, लक्षद्वीप आणि बंगालच्या खाडीतील विविध ठिकाणी मान्सून पुढे सरकणार आहे. या दरम्याम मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube