फडणवीसांनंतर गिरीश महाजन होणार उपमुख्यमंत्री? केला मोठा खुलासा,म्हणाले…

फडणवीसांनंतर गिरीश महाजन होणार उपमुख्यमंत्री? केला मोठा खुलासा,म्हणाले…

Girish Mahajan On Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाराष्ट्रात भाजपला (BJP) मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवणुकीत भाजपला राज्यात अवघ्या 9 जागा जिंकता आल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी पक्ष नेतृत्वाकडे मोठी मागणी करत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

त्यानंतर जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर गिरीश महाजन (Girish Mahajan) उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत होती मात्र आता गिरीश महाजन यांनी मोठा खुलासा करत या बातमीत कोणतेही तथ्य नाही. या बातम्या निराधार आहेत असं गिरीश महाजन  म्हटले आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन म्हणाले, आम्ही सर्वांनी देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटले त्याला नकार दिलेला आहे. त्यांना राजीनामा देण्याची गरज नाही. आम्ही पक्ष नेतृत्वाला आमच्या भावना सांगणार आहोत. राज्याला देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे. त्यांनी गृह खात सांभाळले पाहिजे. असं गिरीश महाजन म्हणाले.

पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, पुढील तीन महिन्यासाठी आम्ही रोड मॅप तयार करून खूप काम आणि कष्ट करणार आहोत. आमचं टीमवर्क आहे, अपयश आलं ते केवळ देवेंद्र फडणवीस यांचं एकट्याचं अपयश नाही. शेवटी हे टीमवर्क आहे. आम्ही कोअर कमिटीचे एवढे सदस्य आहोत, मंत्री आहोत. आम्हीसुद्धा तेवढेच जबाबदार आहोत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीसाठी राजीनामा देण्याची काहीच गरज नाही असं देखील गिरीश महाजन म्हणाले.

तर आज देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत भेट झाली आहे त्यांच्यात काय चर्चा झाली याची मला माहिती नाही मात्र आम्ही आमच्या भावना पक्षश्रेष्ठींना सांगणार आहोत. आम्ही जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला जाऊ तेव्हा पक्षश्रेष्ठींना आमच्या भावना सांगू. देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देण्याची गरज नाही असं देखील यावेळी गिरीश महाजन म्हणाले.

नाशिकमध्ये राडा! आमदार किशोर दराडेंकडून अपक्ष उमेदवार दराडेंना मारहाण

follow us
  • fb
  • instagram
  • youtube