सत्ताबदलाचा अन् तावरेचा संबंध काय? गिरीश महाजनांना विचारा, अंधारेंनी स्पष्टच सांगितलं

सत्ताबदलाचा अन् तावरेचा संबंध काय? गिरीश महाजनांना विचारा, अंधारेंनी स्पष्टच सांगितलं

Pune Car Accident : पुणे अपघात प्रकरणात रोज धक्कादायक (Pune Car Accident) खुलासे होत आहेत. आज उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत अनेक खळबळजनक खुलासे केले. या प्रकरणात शिंदे गट आणि अजित पवार गटाचेच नेते अडचणीत येत आहेत. भाजप मात्र हात झटकत आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला फटका बसू शकतो याचा अंदाज आल्याने आताच यांच्यापासून बाजूला झालं पाहिजे यासाठी हे सगळं असू शकतं. मागील अडीच वर्षांपूर्वी सत्तापालट झालं त्यात डॉ. अजय तावरेंचा काही संबंध आहे का याचं उत्तर गिरीश महाजनांकडून घ्या. सत्ताबदलावेळी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर नेमकं काय घडलं हे तावरेंकडून समोर येऊ शकतं, असे स्पष्ट करत या सगळ्या प्रकारावर मी चार जूननंतर बोलणार आहेच, असा इशारा अंधारे यांनी दिला.

या प्रकरणात शिंदे गट आणि अजित पवार गटाचेच लोक गोत्यात येताना दिसत आहे आणि भाजपाचे लोक मात्र हात झटकून मोकळे होत आहेत. कदाचित निकालाचा अंदाज आल्यामुळे भाजपाच्या हे लक्षात आलं आहे की जर हे असेच आपल्यासोबत राहिले तर विधानसभेला फटका बसू शकतो. त्यामुळे आताच आपण ह्यांच्यापासून बाजूला झालं पाहिजे यासाठीची ही नांदी आहे का. शिंदे गट आणि अजित पवार गटापासून भाजपला फारकतीसाठी सुद्धा हे सगळं असू शकतं, असा संशय त्यांन व्यक्त केला.

Pune Accident : ‘आमदारकी कुठे कशी वापरायची कळतं का?’ ‘त्या’ पत्रावरून अजितदादा टिंगरेंवर भडकले

रक्ताच्या नमुन्याचे सँपल बदलले गेले. मग सत्ताधाऱ्यांना तिथे प्रसिद्धी पाहिजे होती का? बारा तासांच्या आत जामीन दिला ही कुणाला प्रसिद्धी हवी होती? तुमच्या तपासात आधी काय उणीवा आहेत त्या एकदा पहा. या प्रकरणात आता गिरीश महाजन यांनी सुद्धा बोललं पाहिजे असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले.

अडीच वर्षांपूर्वी झालेलं सत्तापालट आणि अजय तावरेचा काही संबंध आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अंधारे म्हणाल्या, याचं उत्तर गिरीश महाजनांनाच विचारा. यावर मी चार जूननंतर बोलणारच आहे. अजय तावरेकडे अनेक नावं आहेत. अजय तावरेला पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने तावरेच्या बाबतीत काही घडायला नको इतकंच माझं म्हणणं आहे.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, मी एक एक्स (ट्विटर)वर पोस्ट केली आहे, जे बोलायचं आहे ते 4 जून नंतरच बोलेन. सध्या पोलिसांवर बराच ताण आहे, त्यांच्यावर अधिकचा ताण वाढवायचा नाही. त्यामुळं चार जूननंतरच मी त्या पोस्टवर बोलेन. डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांच्या जीवाला धोका असू शकतो, पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यायला हवं, त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं.

आर्यन खान आणि सिंघानिया प्रकरण असो की नवाब मलिक प्रकरण असो या प्रकरणातील जे व्हिटनेस आहेत. त्यांच्यासोबत काय घडलं याची सर्वांना कल्पना आहे असा संदर्भही अंधारे यांनी यावेळी दिला आहे. सध्या डॉ. तावरे पोर्शे कार अपघात प्रकरणात महत्वाचे विटनेस आहेत. त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे असे सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

रक्ताळलेला भ्रष्टाचार; पुणे अपघात प्रकरणात सरकारला आरोपी करा, सामनातून प्रहार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज