भाजप ‘या’ राज्यात करणार मोठा उलटफेर; PM मोदींनीच केलं भाकित

भाजप ‘या’ राज्यात करणार मोठा उलटफेर; PM मोदींनीच केलं भाकित

Lok Sabha Elections 2024 : देशातील लोकसभा निवडणुकीत सहा टप्पे पूर्ण झाले (Lok Sabha Elections 2024) आहेत. यानंतर सातवा आणि शेवटचा टप्पा १ जून रोजी होणार आहे. त्यानंतर ४ जूनला निवडणुकीचे जाहीर होणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप विजयाचं मोठं भाकित केलं आहे. भाजपसाठी उत्तर प्रदेश राज्य बालेकिल्ला राहिलं आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश कर्नाटक प्रमाणेच (Karnataka Politics) यूपीतून भाजप उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतात. यंदाही या राज्यांकडून भाजपला मोठ्या अपेक्षा आहेतच. परंतु, मोदींनी एका वेगळ्याच राज्याचा उल्लेख केला आहे जिथे भाजपाचा आलेख सातत्याने वाढत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (West Bengal) अस्तित्वाची लढाई लढत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या राज्यांत आमच्याकडे फक्त तीन जागा होत्या. यानंतर झालेल्या निवडणुकीत बंगालच्या जनतेनं आम्हाला 80 पर्यंत नेऊन ठेवलं. मागील लोकसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळालं. यावेळीही पूर्ण देशात भाजपसाठी पश्चिम बंगाल बेस्ट परफॉर्मिंग स्टेट असेल. भाजपला सर्वाधिक यश याच राज्यात मिळेल असं भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

Uddhav Thackeray On PM Modi : मोदींच्या एनडीएत येण्याच्या ऑफरवर उद्धव ठाकरे म्हणाले, डोळा मारलाय पण…

प्रधानमंत्री मोदींनी ओडिशातील विधानसभा निवडणुकांवरही (Odisha Elections 2024) भाष्य केलं. मोदी म्हणाले, आता ओडिशाचं भाग्य बदलणार (Odisha News) आहे. कारण येथील सरकार बदलणार आहे. मी म्हटलंय की ओडिशा सरकारचा कार्यकाळ ४ जूनपर्यंतच आहे. यानंतर १० जूनला राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री शपथ घेईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. पीएम मोदी पुढे म्हणाले, विरोधकांनी मला अनेक दूषणं दिली.

संसदेतील आमच्या एका सहकाऱ्याने मोजणी केली असता विरोधकांनी मला तब्बल 101 वेळी शिवीगाळ केल्याचं दिसून आलं होतं. यांनी मला मौत का सौदागर म्हटलं होतं. निवडणुका असोत किंवा नसोत या लोकांना वाटतं की शिवीगाळ करण्याचा अधिकार त्यांनाच आहे. ते इतके हताश आणि निराश झाले आहेत की अपशब्द बोलणे आणि शिवीगाळ करणे हाच त्यांचा स्वभाव बनला आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Madha Loksabha : फडणवीसांच्या खेळ्या अन् पवारांची चाल; माढ्यात निंबाळकर की मोहिते पाटील?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज