‘त्या’ दाव्यावरून महाजनांची राऊतांवर सडकून टीका; म्हणाले, त्यांच डोकं तपासाव लागेलं

‘त्या’ दाव्यावरून महाजनांची राऊतांवर सडकून टीका; म्हणाले, त्यांच डोकं तपासाव लागेलं

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत नेहमी आपल्या वक्त्यांवरून चर्चेत असतात. संजय राऊत नेहमी टोकदार भाष्य करत असल्याने त्यांची कायम राज्यभर चर्चा असते. त्यांनी आपल्या रोखठोक‘ या सदरात असाच एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसंच, राऊतांवर भाजप नेते जोरदार टीका करत आहेत. गिरीष महाजन यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे.

 

Pune Accident : अजितदादा पुण्याचे की बिल्डरचे पालकमंत्री? दादा गप्प का? राऊतांचे टोचणारे सवाल

संजय राऊतांच डोक तपासाव लागेल आता तेव्हढच बाकी आहे अशा शब्दांत राऊतांवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. तसंच, 4 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे. नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रसद पुरवली. तसंच, पंतप्रधान मोदी शहांनासुद्दा प्रयत्न करावे लागले असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे. त्यावरून महाजन यांनी राऊतांवर वरील टीका केली आहे.

 

खडसेंच्या भाजप प्रवेशासह गिरीश महाजनांद्दल पवारांच मोठ विधान, म्हणाले मी बोललो तर…

यावेळी गिरीष महाजन जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानावरही बोलले. तापमान वाढल असून त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा आवश्यक काम नसताना बाहेर पडू नये असं आवाहनह महाजन यांनी केलं आहे. दरम्यान, त्यांनी यावेळी जिल्ह्यात बेवारस मृतदेह सापडले त्यावरही भाष्य केलं आहे. हे मृत्यू उष्मघाताने झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी असंही महाजन यावेळी म्हणाले आहे.

 

काय म्हणाले राऊत

संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे की, गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात असं राऊत म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube