नाशिकमध्ये राडा! आमदार किशोर दराडेंकडून अपक्ष उमेदवार दराडेंना मारहाण

नाशिकमध्ये राडा! आमदार किशोर दराडेंकडून अपक्ष उमेदवार दराडेंना मारहाण

MLA Kishor Darade: लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे. आज नाशिक (Nashik) मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नाशिक मतदारसंघात आज शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे (MLA Kishor Darade) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र यावेळी नामसाधर्म्य असलेल्या अन्य किशोर दराडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे कार्यालयात प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी ( 7 जून) दुपारी शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच वेळी नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडेही आपला उमेदवारी अर्ज भरण्यास कार्यलयात आले होते. मात्र दोघांचे नाव सारखेच असल्याने मतदारांचा गोंधळ होऊ शकतो यामुळे विद्यमान आमदार दराडे यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर दराडे यांना धक्काबुक्की करीत अर्ज दाखल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तसेच अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना शिवीगाळही करण्यात आल्याची तक्रार अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी केली आहे.

Tata Altroz Racer भारतात लाँच, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त 9.49 लाख

मात्र आमदार दराडे यांनी अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांना मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे. पोलिसांनी दोन्ही उमेदवारांना नाशिक रोड पोलिस ठाण्यात घेऊन गेले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube