Nashik Politics : गाजर दाखवला अन् शहराध्यक्षांना कार्यालयात डांबून ठेवलं; नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक
Nashik Politics : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून 29 पैकी अनेक महापालिकेत निष्ठावंतांना तिकीट नाकारुन आयात केलेल्या
Nashik Politics : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून 29 पैकी अनेक महापालिकेत निष्ठावंतांना तिकीट नाकारुन आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने भाजपमध्ये अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहे. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते पक्षाविरोधात आंदोलन करताना दिसत आहे. यातच नाशिकमधून एक धक्कादायक बातमीसमोर आली आहे. या बातमीनुसार, नाशिकचे भाजप शहरध्यक्ष सुनील केदार आणि मंडलाध्यक्ष शांताराम घंटे यांना नाशिकरोड येथील पक्ष कार्यालयात निष्ठावंतांना तिकीट न दिल्याने डांबून ठेवण्यात आले होते. अखेर पोलिसांच्या हस्ताक्षेपांतर दोघांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी (Nashik Municipal Corporation Elections) इतर पक्षातून आलेल्यांना भाजपने तिकीट दिल्याने अनेक भाजपचे (BJP) कार्यकर्ते नाराज आहे. नाशिक रोडच्या सहा प्रभागांतील 23 जागांसाठी भाजपकडे 184 इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती मात्र तिकीट देताना भाजपकडून अनेक निष्ठावंतांची नावे कापून दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांनी नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांचा गाजर दाखवत विरोध केला. तसेच जर तिकीट द्यायचे नव्हते तर तसे अधीच स्पष्ट करायला हवे होते, ऐनवेळी विश्वासघात का केला? असा सवाल देखील आता भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनील केदार यांना विचारत आहे.
तर दुसरीकडे एका नाराज कार्यकर्त्यांनी सुनील केदार आणि शांताराम घंटे यांचा घेराव घालत त्यांना कार्यालयात नेऊन शटर ओढून घेतले आणि आता प्रभागात भाजपच्या उमेदवाराला फिरून देणार नाही असा आक्रमक पवित्राही घेतला. या घटनेच्या 20 मिनिटांनंतर पोलिसांच्या मदतीने शहराध्यक्ष सुनील केदार आणि मंडळध्यक्ष शांताराम घंटे यांची सुटका करण्यात आली आहे. मात्र अद्याप देखील कार्यकर्त्यांचा रोष कायम असल्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी अडचणी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
आज ‘या’ 2 राशींसाठी आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार?
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणरा असून 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
