नाशिकमध्ये मोठी उलथापालथ! शिंदेंची हकालपट्टी तर राजवाडेंची धमाकेदार एन्ट्री, ठाकरे गटात इन-आउट ड्रामा सुरूच

नाशिकमध्ये मोठी उलथापालथ! शिंदेंची हकालपट्टी तर राजवाडेंची धमाकेदार एन्ट्री, ठाकरे गटात इन-आउट ड्रामा सुरूच

Uddhav Thackeray Remove Vilas Shinde From Nashik Chief Post : नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला (Shiv Sena) मोठा झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला (Nashik Politics) होता. त्यानंतर विलास शिंदे, नाशिक शहराचे शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे महानगरप्रमुख, यांनी आपली नाराजी व्यक्त करत शिंदे गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर पक्षाने तातडीने कारवाई करत त्यांना पदावरून हटवले आहे.

नवा चेहरा : मामा राजवाडे

विलास शिंदे यांची (Vilas Shinde) हकालपट्टी होताच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मामा राजवाडे यांची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘एक्स’ (पूर्वीचं ट्विटर) हँडलवरून दिली.

बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन! हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नियुक्तीनंतर मामा राजवाडे यांनी (Mama Rajwade) प्रतिक्रिया देताना सांगितले की, पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. माझं मैदानावरचं काम पाहून मला जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षातून बाहेर पडणारे नेते हे वैयक्तिक स्वार्थासाठी निर्णय घेत आहेत. पण एक गोष्ट ठामपणे सांगतो, कोणताही पक्ष संपत नसतो. नाराज कार्यकर्त्यांशी मी संवाद साधणार आहे आणि नाराजी दूर करणार आहे. नाशिक महापालिकेवर मशाल घेऊन भगवा फडकवणारच. ही लढाई शिवसैनिकांच्या बळावर लढणार आहे, असं देखील आश्वासन मामा राजवाडे यांनी दिलं आहे.

पक्षातील गळतीला उत्तर

मामा राजवाडे यांनी भाषणात बबनराव घोलप आणि सुधाकर बडगुजर यांचे नाव न घेता टीका केली. जे पक्ष सोडून गेले आहेत, ते सत्तेच्या मलिद्यासाठी गेले आहेत. काहींना मंत्रीपद, तर त्यांच्या मुलांना आमदारकी दिली गेली. तरीही त्यांनी पक्षाचा त्याग केला. हे आमच्यासाठी बोध घेण्यासारखं आहे, असं राजवाडे म्हणाले.

ब्रेकिंग! पुरीतील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 600 हून अधिक भाविक जखमी

त्यांनी यावेळी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचेही स्पष्ट केलं. माझ्यासमोर कुठलंच आव्हान नाही, शिवसैनिकांचा विश्वास आणि मेहनत हाच माझा बळ आहे, असे राजवाडे यांनी ठणकावून सांगितले. नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) पुन्हा नव्या नेतृत्वासह उभारी घेण्याच्या तयारीत आहे. पक्षातील गळतीला उत्तर देत, मामा राजवाडे यांच्या रूपात एक नव्या ध्येयाने भरलेला चेहरा पुढे आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube