Download App

मोदींच्या शपथविधी पूर्वीच शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंना मोठी जबाबदारी, दिसणार नवीन भूमिकेत

Shrikant Shinde : लोकसभा निवडणुकीत 15 पैकी 7 जागा जिंकणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची आज

Shrikant Shinde : लोकसभा निवडणुकीत 15 पैकी 7 जागा जिंकणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची आज शिवसेना लोकसभा गटनेतेपदी तर श्रीरंग बारणेंची (Shrirang Barane) मुख्य प्रतोद म्हणून निवड केली आहे.

शिवसेनेच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संसद भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात आज शिवसेना संसदीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व शिवसेना खासदारांनी एकमताने खासदार श्रीकांत शिंदे यांची शिवसेना लोकसभा गटनेतेपदी निवड केली. मात्र ही निवड प्रक्रिया शिवसेना पक्षांतर्गत करण्यात आली आहे मात्र ही निवड शिवसेना पक्षांतर्गत करण्यात आली आहे. जेव्हा लोकसभा सभापतींची निवड करण्यात येईल त्यानंतर शिवसेना लोकसभा गटनेतेपदाची अधिकृत निवड प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

श्रीकांत शिंदे यांची लोकसभा गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ते म्हणाले की, आमच्या सर्व आठ खासदारांची 07 लोकसभा आणि एक राज्यसभा खासदार बैठक पार पडली असून या बैठकीत संसदेच्या दोन पदांबाबत चर्चा झाली आणि त्यावर निर्णय झाला आहे. या बैठकीत सर्व खासदारांनी मला लोकसभा संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवड केली आहे. यासाठी मी त्यांचा आभार मानतो आणि संसदेत सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम करू असं ते म्हणाले.

तर या बैठकीमध्ये एकमताने पक्षाचे वरिष्ठ खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड करण्यात आल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

आनंदाची बातमी! राज्यातील ‘या’ भागात 3 दिवसांत दाखल होणार मान्सून; होणार मुसळधार पाऊस

मुख्य प्रतोद म्हणून निवड झाल्यानंतर मी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. संसदेत शिवसेनेच्यावतीनं चांगलं काम होईल यासाठी आम्ही प्रयत्न करु असं श्रीरंग बारणे म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज