एकनाथ शिंदेंसाठी अच्छे दिन! मोदींच्या मंत्रिमंडळात ‘इतक्या’ खासदारांना मिळणार मंत्रिपद

एकनाथ शिंदेंसाठी अच्छे दिन! मोदींच्या मंत्रिमंडळात ‘इतक्या’ खासदारांना मिळणार मंत्रिपद

Modi Cabinet 2024: लोकसभा निवडणुकीत एनडीएला (NDA) तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आज दिल्लीमध्ये झालेल्या एनडीएच्या बैठीकीमध्ये एनडीएमधील सर्व पक्षांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची (Narendra Modi) एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली असून येत्या काही दिवसात राष्ट्रपतींकडे सत्तास्थापेनाचा दावा एनडीएकडून करण्यात येणार आहे.

एनडीए सत्तास्थापेनाचा दावा करणार असल्याची बातमी समोर येताच राज्यातून मंत्रिमंडळात (Modi Cabinet 2024) कोणाला संधी मिळेल याची चर्चा सुरु झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मोदींच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला तीन मंत्रीपदं आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेला 7 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. तर भाजपला 240, टीडीएमला 16 आणि जेडीयूला 12 जागा मिळाले आहे. यामुळे शिवसेनेला तीन मंत्रीपद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशाची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलेली आहे. या निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळालेल्या भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही यामुळे त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी एनडीएमधील इतर घटक पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

तर दुसरीकडे इंडिया आघाडीने (India Alliance) देखील या निवडणुकीत 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्याने इंडिया आघाडी देखील राष्ट्रपतींकडे सत्तास्थापेनाचा दावा करू शकते अशी चर्चा सुरु आहे.

हार्दिक, बुमराह चमकले, भारतीय गोलंदाजांचा कहर, आयर्लंडने दिले 97 धावांचं टार्गेट

आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकांची इच्छा आहे की हे सरकार जावं, योग्य वेळ आल्यावर आम्ही योग्य ती पावलं उचलू अशी माहिती माध्यमांना दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज