Kalyan Lok Sabha Result 2024 : श्रीकांत शिंदे पुन्हा बाजी मारणार, 40 हजार मतांनी पुढे

Kalyan Lok Sabha Result 2024 : श्रीकांत शिंदे पुन्हा बाजी मारणार, 40 हजार मतांनी पुढे
Kalyan Lok Sabha Result 2024 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Result 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Srikanth Shinde) यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
ताज्या आकडेवारी नुसार,  कल्याण लोकसभा मतदारसंघात  श्रीकांत शिंदे यांनी 40 हजार मतांची आघाडी घेतली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे विरुद्ध  ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर अशी लढत पाहायला मिळाली होती.
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते मात्र सध्याच्या आकडेवारीनुसार तिसऱ्यांदा श्रीकांत शिंदे  कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  2019 मध्ये श्रीकांत शिंदे 3 लाख 44 हजार 343 मतांनी निवडुन आले होते तर आता 40 हजार मतांची आघाडी घेतली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज