‘मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ठाकरे गटाच्या प्रचारात’; CM शिंदेंचा घणाघात

‘मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ठाकरे गटाच्या प्रचारात’; CM शिंदेंचा घणाघात

Cm Eknath Shinde : उद्धव ठाकरे गटाकडून (Udhav Thackeray Group) पाकिस्तानची हुजरेगिरी सुरु असून बॉम्बस्फोटातील आरोपी इकबास मुसाला प्रचारात उतरवलं असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) घणाघात केलायं. दरम्यान, महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचीही उपस्थिती होती. ठाणे, कल्याणमध्ये चौथ्या टप्प्यानंतर पाचव्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे.

मुंबईतील मोदींच्या रोड ‘शो’मध्ये राज ठाकरे दिसणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे(शिवसेना) गटाकडून पाकिस्तानची हुजरेगिरी सुरु करण्यात आलीयं. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोप इकबाल मुसाला त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात उतरवलं आहे. त्यांच्या मिरवणुकीमध्ये आता पाकिस्तानचे झेंडे फडकू लागलेले आहेत. हे दुर्देव म्हणजे कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यासारखचं आहे, त्यामुळे लाज तरी कशी वाटणार? या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचा चांगलाच समाचार घेतलायं.

मोठी बातमी : मोदी सरकराला SC चा झटका; NewsClick चे संस्थापक पुरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवरही सडकून टीका केलीयं. ते म्हणाले, पराभवाच्या भीतीने इंडिया आघाडी पूर्णपणे भरकटली असून बिथरली आहे. उद्धव ठाकरे देखील आता त्यांच्या नादी लागून पाकिस्तानची हुजरेगिरी करीत आहेत. एवढं करुन ते काँग्रेसला मतदान करा असं सांगत आहेत. हे ऐकून बाळासाहेबांना किती दुखं: यातना होत असतील. ठाकरेंना सावरकरांचा अपमान झाला तरी चालेल पण पाकिस्तानकडे अणूबॉम्ब असल्याचं सांगणारे अब्दुल फारुख कसे चालतात? असा सवाल करीत शिंदेंनी सडकून टीका केलीयं.

खिलाडी कुमार आणि प्रभासच्या आगामी चित्रपटाचा टीझर जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात होणार प्रदर्शित

दरम्यान, देशात मोदींसारखा पंतप्रधान यापूर्वी झाला नाही आणि होऊ शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेच्या ह्रदयातील पंतप्रधान आहेत. 2014 पूर्वी देशाचा पंतप्रधान एकदाही कल्याणमध्ये आला नाही पण मोदी तीनवेळा आले हे आपलं भाग्य आहे. मोदींच्या आशिर्वादामुळे भिवंडी कल्याण ठाणे आम्ही जिंकलो असून त्यांच्या आशिर्वादाने कपिल पाटील अन् श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज