उद्धव ठाकरेंचा शिंदेंना CM पदाचा शब्द, शिंदे ७-८ तासांचे मुख्यमंत्रीही बनले; फडणवीसांचा दावा

उद्धव ठाकरेंचा शिंदेंना CM पदाचा शब्द, शिंदे ७-८ तासांचे मुख्यमंत्रीही बनले; फडणवीसांचा दावा

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पु्न्हा (Devendra Fadnavis) एकदा स्फोटक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंनी २०१९ मधील निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदाचा शब्द दिला होता. शिंदे हे त्यावेळी सात ते आठ तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते. इतकेच नाही तर त्यांच्या घरात सुरक्षाही तैनात करण्यात आली होती, असा दावा फडणवीस यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.

“उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच CM व्हायचं होतं, त्यांनी..” फडणवीसांचा खळबळजनक दावा

एकनाथ शिंदे नेहमीच पक्षाशी प्रामाणिक राहिले. परंतु, ठाकरेंनी मात्र हिंदुत्वाला तिलांजली देत काँग्रेसशी हातमिळवणी केली. आदित्य ठाकरेंना मोठं करण्यासाठी शिंदेचे पंख छाटण्याचे काम सुरू झाले होते. २०१९ मधील विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनीच केलं होतं. त्यांना मुख्यमंत्रि‍पदाचा शब्द देण्यात आला होता. त्यावेळी ते सात ते आठ तासांसाठी मुख्यमंत्रीही बनले होते. त्यांच्या घरी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती. परंतु, यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतःच मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा फडणवीस यांनी या मुलाखतीत केला.

मराठी माणसांचं मतदान यंदा कुणाच्या बाजूने आहे असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, मराठी मतं ठाकरेंच्या बाजूने आहे हे साफ खोटं आहे. २०१७ मधील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही ८२ जागांवर विजय मिळवला होता. तर त्यांना ८४ जागा मिळाल्या होत्या. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढलो. याही निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. मी स्वतः मराठी आहे. आशिष शेलारही मराठी आहेत. लोक सातत्याने आम्हाला कौल देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता भाषा आणि जातींच्याही पलीकडची आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Lok Sabha Election: शरद पवारांचं दुकान बंद पडू लागलंय, त्यामुळेच…, देवेंद्र फडणवीस यांची कठोर टीका

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज