मुंबईत अवकाळी पावसाचं वादळ! बॅनर कोसळला; धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Mumbai Rain : पाऊसकाळा सुरू होण्यासाठी वेळ असताना अनेक ठिकाणी मात्र अवकाळी पावसाने हाहाकार माजवलाय. यामध्ये विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यात पाऊस कोसळत आहे. आता पुण्यानंतर मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. (Banner Fell) त्यामध्ये वेगाच वादळ असल्याने नुकसानही झालं आहे.
चांगलच झोडपलं
या वादळी पावसामुळे वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान बॅनर कोसळल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. ऐन जॉबवरून सुटण्याच्या वेळीच प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोर जाण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पुण्यानंतर झालेल्या या अवकाळी आणि वादळी पावसाने मुंबईला चांगलंच झोडपलं आहे.
वाहतुकीवर मोठा परिणाम
मुलुंड-ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला. त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्यामुळे मुंबईमधील वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं चित्र आहे.
पार्किंग स्ट्रक्चर खाली कोसळलं
यासोबतच घाटकोपरमध्ये आझाद बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपवरील मोठी होर्डिंग्ज कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेकजण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसंच, वडाळा पूर्वमध्ये असलेल्या श्रीजी टॉवर्सचे पार्किंग स्ट्रक्चर खाली कोसळलंय. त्यामध्ये कोणी अडकलं आहे का? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.