अभिनेता सुशांत शेलार पुन्हा चर्चेत, पडद्यामागच्या कलाकारांसाठी दिली मोठी भेट

अभिनेता सुशांत शेलार पुन्हा चर्चेत, पडद्यामागच्या कलाकारांसाठी दिली मोठी भेट

Sushant Shelar : मुंबईसह राज्यातील अनेक भागात आता मुसळधार पावसाचा आगमन झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई (Mumbai) सारख्या शहरात हातावर पोट असणाऱ्या कलावंतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यायच विचार करून नेहमी आपल्या सामाजिक कार्यातून  वेगवेगळे उपक्रम राबविणारे व सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे अभिनेता व सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुशांत शेलार (Sushant Shelar) यांनी पडद्यामागच्या कलाकारांसाठी छत्री वाटप केली आहे.

सुशांत शेलार नेहमीच सामाजिक कार्यातून वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. त्यांनी कोरोना काळात तसेच चिपळूणची पूर परिस्थितीमध्ये अनेकांना मदतीचा हात दिला होता. तसेच त्यांनी पुन्हा एकदा ‘चिरायू’च्या माध्यमातून  पडद्यामागच्या अनेक कलावंतांचा सन्मान, मनोरंजन सृष्टीतील कलाकारांसाठी मराठी बॉक्स क्रिकेट लीग, वैद्यकीय मदत असे अनेक उपक्रम राबविले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशाने आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Srikanth Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचे सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष  सुशांत शेलार यांनी पडद्यामागच्या कलाकारांसाठी आज  छत्रीवाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी ते म्हणाले की, हातावर पोट असणाऱ्या कलावंतांना काही गोष्टी परवडत नाही त्यामुळे आम्ही आज  शिवसेना पक्षातर्फे असा कलावंतांना भेट म्हणून छत्री देण्याचे काम केले आहे.

ओबीसी आंदोलन स्थगित, पंकजा मुंडे म्हणाल्या, माघार घेण्याचा प्रश्नच नाही!

तसेच भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गर्दर्शनातून अनेक चांगले सामाजिक उपक्रम राबवणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

‘आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’, भुजबळांचा जरांगे पाटलांना टोला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज