“भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला”; बच्चू कडूंचा पुन्हा घरचा आहेर

“भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला”; बच्चू कडूंचा पुन्हा घरचा आहेर

Bachchu Kadu : लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत उठापटक सुरू (Lok Sabha Election) आहे. पराभवाची कारणं शोधली जात आहेत. भाजपला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे या पराभवाचं खापर सहकाऱ्यांवर फोडलं जात आहे. अजित पवार (Ajit Pawar) सोबत आल्याने भाजपला मोठं नुकसान झालं असं आता जाहीरपणे बोललं जात आहे. एकनाथ शिंदेंवरही काही (Eknath Shinde) भाजप नेत्यांचा रोष आहे. यातच आता भाजपवर सातत्याने टीका करणारे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजपला धारेवर धरलं आहे. भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला असा आरोप कडू यांनी केला. बच्चू कडू यांनी (Bachchu Kadu) माध्यमांंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला.

खरंतर भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून असं करणं योग्य नाही ज्या ठिकाणी विरोध होता तिथे आपला उमेदवार बदलला नाही. मात्र उमेदवार बदलण्यासाठी सहकारी पक्षांवर दबाव टाकला. अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांच्या नावाला प्रचंड विरोध होता तरी देखील भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली. हिंगोलीत मात्र शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी भाजपने नाकारली. शिवसेनेचा उमेदवार मात्र उमेदवारी नाकारण्याचा अधिकार भाजपने राखून ठेवला होता. अशाच पद्धतीने शिवसेनेला चार उमेदवार बदलण्यास भाग पाडले, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

अमरावतीत नवनीत राणांचा पराभव, कॉंग्रेसच्या बळवंत वानखडेंनी दाखवला इंगा

आता पुढील वेळी एकनाथ शिंदे यांनाच या नको त्या मतदारसंघातून उभे राहा तेथून उमेदवारी दाखल करा असे  भाजप सांगेल असा खोचक टोला बच्चू कडूंनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजप नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, एक्झिट पोलमध्ये अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा विजयी होतील, अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. मात्र निवडणूक निकालात अमरावतीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. काँग्रेसचे बळवंत वानखडेंनी नवनीत राणांना पराभवाची धूळ चारली. बळवंत वानखडे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपच्या नवनीत राणा यांचा 19 हजार 731 मतांनी पराभव केला. वानखडे यांना 5 लाख 26 हजार 271 मते मिळाली, तर नवनीत राणा यांना 5 लाख 6 हजार 540 मते मिळाली. राणा यांच्या पराभवात प्रहार पक्षाच्या उमेदवाराचाही वाटा होताच.

‘आंदोलन कसं करावं हे लक्ष्मण हाकेंकडून शिका’ नाव न घेता पंकजा मुंडेंनी लावला जरांगे पाटलांना टोला 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज